नवोदय विद्यालयात अग्निशमन प्रात्यक्षिक

नवोदय विद्यालयात अग्निशमन प्रात्यक्षिक

06666
कागल : जवाहर नवोदय विद्यालयात अग्निशमन प्रात्यक्षिकावेळी माहिती सांगताना पालिकेचे अग्निशमन विभागप्रमुख बी. ए. माळी
.........
नवोदय विद्यालयात
अग्निशमन प्रात्यक्षिक

सकाळ वृत्तसेवा
कागल, ता. १४ : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त कागल नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने येथील जवाहर नवोदय विद्यालयात अग्निशमन प्रात्यक्षिक दाखविण्यात आली. मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके झाली.
अग्निशमन विभागप्रमुख बी. ए. माळी यांनी आगीपासून तसेच आपत्कालीन परिस्थितीत बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अग्निशमन विभागाकडील कर्मचाऱ्यांनी ''आग कशी विझवावी'' याचे अग्निशमन गाडीसह प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी विद्यार्थ्यांनी अग्निशमन गाडीची माहिती घेतली. यावेळी अग्निशमन विभागाचे वाहनासह फायरमन विभागप्रमुख उपस्थित होते. रणजित साठे, अमोल आंबी, नीतेश कांबळे, पी. आर. कुसाळ, तानाजी पसारे, युनायटेड सेल्स कार्पोरेशनचे प्रतिनिधी तसेच नवोदय विद्यालयाचे प्राचार्य रवी दामोदर यांच्यासह शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com