कागल : नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने शनिवारी कागल शहरातील दहावी -बारावीतील गुणवत्तांचा सत्कार

कागल : नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने शनिवारी कागल शहरातील दहावी -बारावीतील गुणवत्तांचा सत्कार

मुश्रीफ फाउंडेशनतर्फे
शनिवारी गुणवंतांचा सत्कार
कागल : नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनतर्फे शहरातील दहावी- बारावी परीक्षेमधील गुणवंतांचा सत्कार शनिवारी (ता. ८) होणार आहे. वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत गैबी चौकात छत्रपती शाहू हॉलमध्ये सकाळी दहा वाजता कार्यक्रम आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा, प्रशालेमध्ये पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनींनी पालकांना घेऊन यावे. येताना मार्कलिस्ट झेरॉक्स सोबत घेऊन येणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा बँक संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केले आहे. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर यांनी दिली. नाव नोंदणीसाठी राहुल गाडेकर यांच्याशी संपर्क करावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com