कोल्हापूर..राज्यपाल कोश्यारीच्या विरोधात शिवसेनेचे जेलभरो आंदोलन.

कोल्हापूर..राज्यपाल कोश्यारीच्या विरोधात शिवसेनेचे जेलभरो आंदोलन.

4310
...

राज्यपालांविरोधात शिवसेनेचे जेलभरो आंदोलन

कोल्हापूर ता. ११ ः शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बोलावू नये, या करिता उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र घोषणाबाजी करीत जेलभरो आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ‘राज्यपाल कोश्यारी यांनी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे. हा अवमान कधीही खपवून घेतला जाणार नाही. राज्यपालांना कोल्हापुरात पाय ठेवायचा असेल तर त्यांनी आधी छत्रपती शिवरायांची माफी मागावी. दीक्षान्त समारंभासाठी राज्यपाल कोश्यारी प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत. ज्यांनी त्यांना आमंत्रित केले ते विसरले असतील, पण शिवसैनिक कदापिही शिवरायांचा अवमान विसरणार नाहीत.’ यावेळी शिवसैनिकांनी शिवाजी विद्यापीठाच्या बंद गेटवरून चढून विद्यापीठात घुसण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, मंजित माने, रवी चौगुले, राजू यादव, विनोद खोत, राहुल माळी, विशाल सूर्यवंशी, दीपाली शिंदे, शशि बीडकर यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com