
कोल्हापूर . .प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनास मल्हासेनेचा पाठींबा ..
4533
कोल्हापूरः प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात बोलताना बबनराव रानगे .
...
प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनास मल्हासेनेचा पाठींबा
आंदोलन २० व्या दिवशीही सुरुच : दखल न घेतल्यास तीव्र लढ्याचा इशारा
कोल्हापूर ता. १९ः चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनास महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेनेच्यावतीने पाठींबा देण्यात आला. गेल्या १९ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची शासनाने अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामुळे हे आंदोलन सुरुच ठेवण्यात येणार असून भविष्यात तीव्र लढा उभारण्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला. दरम्यान, मल्हार सेनेचे बबनराव रानगे यांनी आंदोलनस्थळी येवून जाहीर पाठींबा दिला.
यावेळी धनगर समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष राघू हजारे, मल्हार सेना जिल्हाप्रमुख शहाजी सिद, रामचंद्र रेवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी छगन नांगरे, पांडुरंग वग्रे, बाबूराव बोडके, भगवान झोरे, आनंद डफडे, बबलू फाले, आनंदा धनगर आदी उपस्थित होते.