कोल्हापूर . .भाविकांसाठी विविध सामाजिक सुविधा. ..

कोल्हापूर . .भाविकांसाठी विविध सामाजिक सुविधा. ..

जीवन मुक्ती व्हाईट आर्मीतर्फे
भाविकांसाठी आरोग्य सुविधा

कोल्हापूर, ता. ३० ःजीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मीतर्फे चैत्र यात्रेत विविध आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. संस्थेमार्फत २४ तास आणि ४/५ दिवस येणाऱ्या भाविकांना सुसज्ज अशा वातानुकूलीत हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. येथे मोफत आरोग्य तपासणी आणि औषध उपचार करण्यात येणार असल्याची माहिती व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉक्टर सेवा, जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मीच्या वतीने जोतिबा भाविकांसाठी हॉस्पिटल उभे करण्यात आले आहे. सलग ५ दिवस शिफ्ट चोविस (२४) सेवा सुरू राहणार आहे. यामध्ये एक वैद्यकिय पथक औषधे व अॅम्ब्यूलन्ससह दिवसभर मदत करणार आहे. तसेच होमिओपॅथीक डॉक्टरांची निहा संघटना, केएमए असोसिएशन, नेमा संघटना, मुस्लीम डॉक्टर असोसिएशन, जनरल प्रॅक्टीसनर्स असोसिएशन, केटीजीपीए असोसिएशन असे १०० डॉक्टरांची टिम काम करणार आहे.
जीवन मुक्ती व्हाईट आर्मी हॉस्पिटल, डॉक्टर सेवा, रेस्क्यू टिम, आपत्कालिन कक्ष (कंट्रोल रूम ), हार्ट ब्रिगेड, रुग्णवाहिका, शोध मोहिम, विश्रांती ग्रह / हिरकणी कक्ष आदी सेवा भावीकांसाठी असतील डॉ.अमोल कोडोलीकर, डॉ. राजेश सातपूते, डॉ. शिवराज देसाई, डॉ. हरिष नांगरे, डॉ. दिपक पोवार, डॉ. हर्षवर्धन जगताप उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com