कंदलगाव - ..कंदलगाव ग्रामपंचायतीकडून पडीक जागेचे सपाटीकरण

कंदलगाव - ..कंदलगाव ग्रामपंचायतीकडून पडीक जागेचे सपाटीकरण

04692
कंदलगाव ग्रामपंचायतीतर्फे
पडीक जागेचे सपाटीकरण
आडगळीतील जागेत भाजी मंडई; नागरिकांतून समाधान

कंदलगाव, ता. १२ ः कंदलगाव ग्रामपंचायतीतर्फे गावातील पडीक व अडगळीच्या जागा सपाटीकरण सुरू आहे. पडीक जागा वापरात आणून महसूल वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
अनेक वर्षापासून शाळेचा माळ परिसरात दोन एकर जागेवर गारवेल आणि कचरा साचत होता. या जागेच्या वापरासाठी गटनेते वसंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जेसीबीच्या सहाय्याने मुरूम टाकून जागा सपाटीकरणाचे काम सुरू आहे. गावात मुख्य चौकात भरणारी भाजी मंडई या जागेवर आणण्याचा विचार आहे; असे सरपंच व उपसरपंचांनी सांगितले. पडीक व आडगळीत असणारी जागा मुरूम टाकून सपाटीकरण झाल्याने या जागेचा वापर अनेकांना छोट्या-मोठ्या कार्यासाठी होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार
मुख्य चौकात दोन वर्षांपासून भाजी मंडई भरत आहे. भाजी मंडईमुळे मुख्य चौकात गर्दी होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत होता. यावर पर्याय म्हणून शाळेच्या माळावरील जागेत कचरा कोंडाळ्यासाठी काढलेल्या खड्ड्यातील मुरूम टाकून ती जागा सपाटीकरण केली आहे. सपाटीकरण केलेल्या जागेत भाजी मंडई भरली तर मुख्य चौकात होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे.

कोट ..
गावच्या शाळेशेजारी ही जागा पडीक होती. गटनेत्यांच्या मार्गदर्शनाखाली वापरात आणली. भविष्यात अशा जागांवर सुशोभीकरण करून गाव स्वच्छ करू.
राहुल पाटील - सरपंच
सतीश निर्मळ -उपसरपंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com