कोडोली येथे पाच कोटी च्या कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला

कोडोली येथे पाच कोटी च्या कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला

02556
दुर्गेवाडीस थ्री फेज लाईट
स्मशान शेडसाठी निधी देऊ

आमदार विनय कोरे; साडेचार कोटींच्या जलकुंभाचे लोकार्पण

कोडोली, ता. ११ : कोडोली (ता. पन्हाळा) येथील दुर्गेवाडी वसाहतीमधील धरणग्रस्तांचा त्याग लक्षात घेता त्यांच्यासाठी आमदार फंडातून पंधरा लाखांचा निधी विठ्ठल मंदिरास देत दुर्गेवाडी भागास थ्री फेज लाईट व स्मशान शेडसाठी निधी देणार असल्याचे आमदार विनय कोरे यांनी सांगितले. चांदोली वसाहत दुर्गेवाडीतील जलजीवन मिशनअंतर्गत ४ कोटी ४० लाख खर्चून उभारलेल्या जलकुंभाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.
दुर्गेवाडीत चार कोटी चाळीस लाखांची पाण्याची टाकी, कोडोलीत साठ लाखांचे अंतर्गत रस्ते असे कोडोली व दुर्गेवाडीतील पाच कोटींच्या कामांचे लोकार्पण आज झाले. यावेळी गोकुळ संचालक अमरसिंह पाटील म्हणाले, ‘धरणग्रस्तांच्या त्यागातून वारणा नदी परिसर हरित झाला आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्यांची प्राधान्याने पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच भारती पाटील, उपसरपंच माणिक मोरे, ग्रामपंचायत सदस्य मोहन पाटील, महादेव पाटील,रणजित पाटील, ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील, जनसुराज्य पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र पाटील वकील, नागरी पतसंस्था चेरमन संजय मेणकर, उदय पाटील, शिला झेंडे, निशा कुंभार, नंदन पाटीलसह नागरिक उपस्थित होते. गणेश शेडगे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com