
देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात.
04186
आर. व्ही. देसाई विद्यालयात स्नेहसंमेलन
कोनवडे : मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथे आर. व्ही. देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा झाला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष आर. व्ही. देसाई होते. प्रा. डॉ. जालंदर पाटील, गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे प्रमुख उपस्थित होते. यावेळी क्रीडा, रांगोळी, पाककला, वेशभूषा, संगीत खुर्ची स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविले. डॉ. पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी मोबाईलचा गरजेपुरता करावा. आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे.’ गटशिक्षणाधिकारी श्री. मेंगाणे यांनी मार्गदर्शन केले. स्वागत मुख्याध्यापक डी. एस. देसाई यांनी केले. वारके सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितराव केणे, सरपंच जयश्री खेगडे, उपसरपंच मनीषा नलवडे, मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर, रणजित देसाई, के. ए. देसाई, डॉ. एस. बी. शिंदे, एस. पी. कासार, एस. के. नलवडे, अरुण कांबळे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजीवनी देसाई, एस. आर. देसाई, एस. एस. मोरे यांनी आभार मानले.