मिणचे, हेदवडे परिसरात गव्यांचा वावर : भीतीचे वातावरण.

मिणचे, हेदवडे परिसरात गव्यांचा वावर : भीतीचे वातावरण.

गव्‍यांचा पिकांवर ताव
भुदरगड तालुक्यातील चित्र; शेतकरी हतबल
कोनवडे, ता. २० : भुदरगड तालुक्यातील पश्चिम भाग असलेल्या फये, मिणचे, हेदवडे परिसरात गव्यांचा वावर वाढला असून गव्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ऊस, मक्का व अन्य पिकांवर ताव मारून पिकांची नासधूस वन्यप्राण्यांकडून केली जात आहे. पिके फस्त होत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. गव्यांचा बंदोबस्त होणार का, अशी विचारणा शेतकरी वर्गातून होत आहे.
भुदरगड तालुक्यातील आकुर्डे, शेणगाव, फये, देवकेवाडी, गिरगाव, हेदवडे, कोळवण, मिणचे, पंडीवरे, मोरस्करवाडी, काळमवाडी, गिरगाव धनगरवाडासह परिसरात गव्यांनी धुडगूस घातला आहे. गव्यांनी परिसरातील पिकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. गव्यांच्या भीतीने शेताकडे जाणे अवघड बनले आहे. पंधरा ते वीस संख्या असणारे कळप यांचा वावर परिसरात वाढला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गव्यांचा बंदोबस्त होण्याची मागणी होत आहे.
---
वृक्षसंपदा धोक्यात
निसर्गाचा समतोल राखणारी औषधी वनस्पती तसेच हिरडा, जांभूळ, चंदन, हेळा, निलगिरी, जांभूळ, पिंपळ, उंबर, फणस, आंबा अशा वृक्षाची तस्करी वाढली आहे. त्यामुळे जुने वृक्ष व वृक्षसंपदा धोक्यात आली आहे. जंगलांना आगी लावल्यामुळे याचा परिणाम वन्यप्राणी जंगले सॊडून मानवी वस्तीकडे वळू लागले आहेत.
---
बेहिशेबी जंगलतोड
मिणचे, हेदवडे, फये, मोरस्करवाडी, टिक्केवाडी, शेणगाव, नवरसवाडी, पंडिवरे, भूमकरवाडीसह परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. विविध वृक्षानी हा परिसर समृद्ध आहे. लाकूड पासच्या नावाखाली मोठी तस्करी सुरु आहे. परिसरात शेकडो ठिकाणी तोडलेल्या झाडांचे ढीग पडले आहेत. ते कारवाई करून जप्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे जंगले संपत चालल्याने प्राणी गावांकडे वळल्याचे नागरिक सांगतात.
---
कोट
परिसरात गव्यांचा वावर असल्याने गव्यापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी रात्रभर पिकांचे रक्षण करावे लागते. रात्रभर मचाणवर वस्ती करावी लागते.
- विलास मोरस्कर, शेतकरी, मोरस्करवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com