बांधावरून पडून गव्याचा मृत्यू : भुदरगड तालुक्यातील हेदवडेपैकी डोंगळेवाडी येथील घटना.

बांधावरून पडून गव्याचा मृत्यू : भुदरगड तालुक्यातील हेदवडेपैकी डोंगळेवाडी येथील घटना.

डोंगळेवाडी येथे बांधावरून पडून गव्याचा मृत्यू

कोनवडे : हेदवडेपैकी डोंगळेवाडी (ता. भुदरगड) येथे चारा व पाण्याच्या शोधात मध्यरात्री भटकत आलेल्या कळपातील चार ते पाच वर्षांच्या एका मादी गव्याचा बांधावरून पडून मृत्यू झाला. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास हेदवडेचे सरपंच राजाभाऊ देसाई यांना ग्रामस्थांनी डोंगळेवाडी गावाशेजारी बारदेस्कर यांच्या शेतात गवा मृत झाल्याचे सांगितले. मध्यरात्री अन्न-पाण्याच्या शोधात भटकत असताना बांधावरून पडून पोटाला गंभीर इजा झाल्यामुळे गव्याचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. एम. डी. मेटांगळे यांनी शवविच्छेदन केले. गव्याचे दहन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com