महसूल विभाग निवडणुकीत व्यस्त, नागरिक त्रस्त

महसूल विभाग निवडणुकीत व्यस्त, नागरिक त्रस्त

महसूल विभाग निवडणुकीत व्यस्त, नागरिक त्रस्त

सात-बारा उतारे, सरकारी दाखले मिळत नसल्याने कामे खोळंबली

सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. २६ : लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी महसूल विभागाच्या बहुतांशी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केली आहे. त्यामुळे मंडल अधिकारी, तलाठी कार्यालयात अपवादात्मक स्थितीतच हजर असतात. त्यामुळे याचा कार्यालयातील दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. नागरिकांना आवश्यक असलेले सात-बारा उतारे, दाखले मिळत नसल्याने त्यांची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे कधी एकदा निवडणूक होते, असे नागरिकांना झाले आहे.
तलाठी, मंडल अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शासकीय कामासाठी सात-बारापत्रकी वारसानोंद, बोजा चढवणे, कमी करणे, तलाठी उत्पन्न दाखले, पीक नुकसान पंचनामा, महसूल कार्यालयांतील सुनावण्या यांसह विविध कामे खोळंबली आहेत. मतदान होईपर्यंत आता संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दैनदिन कामाला पुरेसा वेळ मिळणार नाही, हे स्पष्टच आहे. यासह रहिवासी, उत्पन्न, डोंगरी आदी दाखले तहसीलदार, नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीने दिले जातात. मात्र, तेही निवडणूक कामात गुंतले आहेत.
निवडणुकीचे काम दिवसभर सुरू असल्याने दाखल्यांची प्रकरणे प्रत्येक टप्प्यावरून पुढे सरकण्यास विलंब होत आहे. मात्र, काही अधिकारी व कर्मचारी कामातून वेळ काढून वेळच्यावेळी दाखले पुढे सोडण्याची तत्परता दाखवत आहेत. वैद्यकीय उपचारासाठी तसेच अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी तातडीने दाखल्यांची गरज असणारे नागरिक निवडणूक कामकाजाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांना भेटून अथवा मोबाईलवरून संपर्क साधून दाखल्याची प्रक्रिया पूर्ण करून घेत आहेत. मात्र, त्यालाही मर्यादा येत आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गौरसोय होत आहे.
..................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com