टेंबलाबाई टेकडी टाकीची दुरावस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेंबलाबाई टेकडी टाकीची दुरावस्था
टेंबलाबाई टेकडी टाकीची दुरावस्था

टेंबलाबाई टेकडी टाकीची दुरावस्था

sakal_logo
By

टेंबलाई टेकडीवरील
टाकीची दुरवस्था
परिसरात गैरकृत्ये; प्रशासकांना साकडे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : टेंबलाई टेकडी येथे महापालिकेची टाकी असून तेथून या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. ही टाकी जमिनीखाली असून तिची दुरवस्था झाली आहे. तसेच येथे विविध प्रकारची गैरकृत्ये चालतात. त्यामुळे प्रशासकांनी स्वतः येऊन येथे पाहणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते फिरोज शेख यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आज प्रशासक डॉ. कांदबरी बलकवडे यांना दिले.
निवेदनातील माहितीनुसार, टाकीवरील एकही झाकण शिल्लक नाही. तुटलेली काही झाकणे टाकीतच पडलेली आहेत. टाकीवर राजरोसपणे परिसरातील लोक पार्टी करतात. तसेच जेवणातील खरकटे, मद्याच्या बाटल्या येथेच टाकतात. पर्यायाने परिसरात अस्वच्छता पसरते. येथे असणाऱ्या ३ टाक्यांपैकी कमी दाबामुळे केवळ २ च टाक्यांमध्ये पाणी मिळते. तिसऱ्या टाकीत २-३ फूटच पाणी येते. या टाक्या जीर्ण आणि खूप जुन्या झाल्या असल्याने पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात आहेत. हा भाग दाट लोकवस्तीचा आहे. कमी दाबाने पाणी येथे ही येथील मुख्य समस्या आहे. पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना अपुऱ्या सुविधा असून त्यांना तुटलेल्या शेडमध्ये काम करावे लागते. येथे अधिकाऱ्यांची फिरती नसल्याने सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. टाकीच्या परिसरात प्रचंड प्रमाणात प्लास्टिक व कचरा टाकला जात आहे. त्याचा उठाव होत नाही. अशा अनेक समस्यांच्या विळख्यातून पाणी टाक्यांची सुटका होण्यासाठी आपण तातडीने सदर परिसरास भेट देऊन पाहणी करावी. जबाबदार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटील द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
------------------------------------------------------------------------