वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्षारोपण
वृक्षारोपण

वृक्षारोपण

sakal_logo
By

74038

टेंबलाई टेकडी परिसरात
लावली ६५ वडाची रोपे

कोल्हापूर, ता. ८ ः श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त टेंबलाई टेकडी परिसरात ६५ वडाची रोपटी शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते लावण्यात आली.
टेंबलाई टेकडी परिसरात वडाच्या झाडांनी बनणारी नैसर्गिक कमान साकारण्याचा नागरिकांचा प्रयत्न आहे. यासाठी महापालिकेचा उद्यान विभाग, विभागीय कार्यालय, आरोग्य विभागाने यंत्रणा उपलब्ध करून दिली. वन विभागाच्या कागल नर्सरीच्या सोनल केसरकर यांनी वडाची रोपे दिली. यावेळी दहा वर्षांत शहरात विविध ठिकाणी विविध देशी जातींची झाडे लावण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करण्याचा मानस नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय पोवार, सहायक उद्यान अधीक्षक राम चव्हाण, नेत्रपाल जाधव, धुळसिद्ध पुजारी, महेश ढेंगे, नीलेश सूर्यवंशी, अमोल बुढ्ढे, सचिन पवार, परितोष उरकुडे, विद्या पाथरे, धनश्री भगत, अर्चना कुलकर्णी, महादेव मोरे, विशाल पाटील, अजय कोराणे, सचिन घाटगे, जीवन बोडके, राधेश्याम रेंगडे, महेश दिघे, सुशील हंजे, हंबीरराव मुळीक, रियाज बारगीर, संदीप संकपाळ, फिरोझ शेख, राजू पाटील, रशीद बारगीर, इम्तियाज नायकवडी, नीलेश माने, संदीप पाटील, हर्ष, जय मुळीक, युनूस तांबोळी, सुनील रेंगडे आदी उपस्थित होते.