विरशैव समाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरशैव समाज
विरशैव समाज

विरशैव समाज

sakal_logo
By

74312

वीरशैव रुद्रभूमीचा विकास
करणार ः आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर, ता. ९ ः वीरशैव समाजाच्या जुन्या बुधवार पेठेतील रुद्रभूमीच्या विकासकामासाठी निधी मंजूर करून घेण्याबरोबरच अपूर्ण राहिलेली सर्व कामे केली जातील व रुद्रभूमीचे स्वप्न पूर्ण करून देऊ, असे आश्‍वासन आमदार जयश्री जाधव यांनी दिले.
वीरशैव लिंगायत समाजतर्फे ‘जीवनसाथी’ मासिकाच्या प्रकाशन कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे हे अध्यक्षस्थानी होते. अक्कमहादेवी मंडपात झालेल्या या कार्यक्रमास श्री वीरशैव बॅंकेचे अध्यक्ष अनिल स्वामी, संचालक अनिल सोलापुरे उपस्थित होते.
आमदार जाधव म्हणाल्या, ‘सामाजिक, सहकार, शैक्षणिक, व्यापार, उद्योग आदी क्षेत्रांतील वीरशैव समाजाचे कार्य हे कौतुकास्पद असून, या समाजाच्या पाठीशी मी कायम उभी राहीन.’ संदीप कोरे, अनिल स्वामी यांचा सत्कार करण्यात आला.
सुनील गाताडे यांनी स्वागत केले, तर सचिव राजू वाली यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत स्वामी यांनी आभार मानले. राजेश पाटील-चंदूरकर, ॲड. सतीश खोतलांडे, किरण साळगावकर, राहुल नष्टे, सूर्यकांत वडगावकर, चंद्रकांत हळदे, महिला मंडळाच्या अध्यक्षा माधवी बोधले, सुजाता विभुते, स्मिता हळदे, संगीता करंबळी, अमृता करंबळी, सुनंदा नष्टे, शैला गाताडे उपस्थित होते.