शिवसेना पत्रक

शिवसेना पत्रक

कोरे- संभाजीराजेंनी लुटूपुटू करू नये

शिवसेनेचे पत्रक ः विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यात सहभाग घ्यावा

कोल्हापूर, ता. १५ ः किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणावरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती व आमदार डॉ. विनय कोरे यांनी एकमेकांवर आरोप करून लुटूपुटूची लढाई करण्यापेक्षा किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्यात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, विशाळगड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी शिवसेना व शिवप्रेमी ठाम आहेत. शिवसेनेने विशाळगडचे अतिक्रमण काढण्यासाठी कारसेवेचे आंदोलन केले, त्यावेळी प्रशासनाने व पोलिसांनी दडपशाहीने शिवसैनिकांना अटक केली व शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले. किल्ले विशाळगडवरील अतिक्रमण महसूल व वनविभागात आहे. वनविभागाचे उप वनसंरक्षक गुरुप्रसाद यांनी कोणाचीही वाट न पाहता किल्ले विशाळगडच्या पायथ्याजवळील अतिक्रमण काढले. मग पुरातत्त्व खात्याने अतिक्रमण पाडण्याचे निर्देश कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिले असताना जिल्हाधिकारी हे अतिक्रमण काढण्यासाठी महाशिवरात्रीची वाट का पाहत आहेत? अतिक्रमणधारकांना न्यायालयात जाण्याची संधी का देत आहेत? कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची ही भूमिका संशयास्पद आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबसाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुरोगामी महाराष्ट्रात अवमान झाला. त्यावेळी आंदोलन करणार असे म्हणणारी ही मंडळी गप्प का होती? विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे, म्हणून संभाजीराजे व आमदार कोरे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून लुटूपुटूची लढाई करण्यापेक्षा शिवसेनेच्या किल्ले विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याच्या कारसेवा आंदोलनात सहभागी व्हावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com