पत्रके पत्रके आणि पत्रके पत्रके

पत्रके पत्रके आणि पत्रके पत्रके

‘अवनि’तर्फे लिंग समभाव संवाद कार्यशाळा
कोल्हापूर : अवनि संस्था संचालित लिंगभाव समानता व समानतेसाठी कृती प्रकल्पांतर्गत लिंग समभाव संवाद कार्यशाळा बजापराव माने
तालीम मंडळ येथे झाली. माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर अध्यक्षस्थानी होते. दिलशाद मुजावर प्रमुख उपस्थित होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून उद्‌घाटन झाले. संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले म्हणाल्या, ‘‘स्त्री-पुरुष किंवा मुलगा-मुलगी असा भेदभाव करू नये. मुलांना आतापासूनच लिंगभाव समानतेचे धडे अभ्यासक्रमातून द्यावेत.’’ विभावरी नकाते, कृष्णात स्वाती यांनी मार्गदर्शन केले. वि. स. खांडेकर विद्यालय, प्रबुद्ध भारत हायस्कूल, राजर्षी शाहू हायस्कूल, दादासाहेब मगदूम हायस्कूल, राजवीर पब्लिक स्कूल वाशी, नागोजीराव पाटणकर, महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, इंदुमती गर्ल्स हायस्कूल, विकास विद्यामंदिर, उषाराजे हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूलमधील १६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. रेश्‍मा खाडे, विभावरी नकाते, प्रा. अर्चना जगतकर, डॉ. मनीषा नायकवडी, प्रकल्प समन्वयक विक्रांत जाधव, शाहरुख आटपाडे, जैनुद्दीन पन्हाळकर, साताप्पा मोहिते उपस्थित होते. जयश्री कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कौशल्या आंग्रे यांनी आभार मानले.
...
‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान ३० पासून
कोल्हापूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ३० जानेवारीपासून ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे ‘कुष्ठरोगमुक्त कोल्हापूर’ करण्यासाठी तसेच कुष्ठरुग्णांशी भेदभाव करणार नाही, अशा आशयाचे आवाहनाचे वाचन करण्यात येणार आहे. सरपंचांचे भाषण, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कुष्ठरोगमुक्त भारतासाठी प्रयत्न करण्याबाबतची प्रतिज्ञा उपस्थित नागरिकांना देण्यात येईल. ‘सपना’ या कुष्ठरोगाच्या जनजागृतीकरीता तयार केलेल्या आयडॉलने समाजाला द्यायच्या संदेशाचे वाचन करण्यात येईल. ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृतीअंतर्गत महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान कुष्ठरोग निवारण दिन, पंधरवडा साजरा करण्यात येईल. कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास ती लपविण्यापेक्षा नजीकच्या शासकीय, निमशासकीय, महापालिका, नगरपालिका दवाखान्यात जाऊन तपासून घ्यावी, असे आवाहन आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. उषा कुंभार यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
...
‘आव्हान ग्रुप’तर्फे रेकॉर्ड डान्स स्पर्धा
कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त आव्हान ग्रुपतर्फे जुना बुधवार पेठ, केसापूर गल्ली येथे मंडळाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजन केले आहे. स्पर्धा दोन गटांत विभागून असेल. लहान गट, मोठ्या गटामध्ये स्पर्धक हे ग्रुप डान्ससाठी पाच असतील. स्पर्धकांनी येताना आधार कार्ड आणणे अनिवार्य असेल. माहितीसाठी संपर्क साधावा. सायंकाळी सात वाजता स्पर्धा सुरू होतील.
...
शंकरराव तोरस्कर यांचा स्मृतिदिन उद्या
कोल्हापूर : संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील शिलेदार शंकरराव दत्तात्रय तोरस्कर यांच्या निधनाला बुधवारी (ता. २५) ६६ वर्षे पूर्ण होत आहेत. यासाठी सकाळी ९.३० वाजता तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ येथे त्यांच्या ६७ व्या स्मृतिदिनी उजाळा देण्यासाठी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, मधुरिमाराजे छत्रपती, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका श्रुतिका काटकर, आनंदराव तोरस्कर, विलासराव तोरस्कर यांच्या हस्ते स्मृतिस्तंभाचे पूजन होईल. यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात येईल, अशी माहिती हुतात्मा शंकरराव तोरस्कर कला, क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टचे सचिव संजय तोरस्कर यांनी पत्रकाद्वारे दिली.
...
शेख, डॉ. बुलबुले, थोरवत, जरग यांची निवड
कोल्हापूर : प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या राज्य कार्यकारिणीला मंजुरी दिली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून युसूफ इमदादअली शेख यांची प्रदेश उपाध्यक्ष, डॉ. प्रमोद बुलबुले यांची प्रदेश सरचिटणीस, यशवंत थोरवत यांची प्रदेश सदस्य, तर विक्रमसिंह जरग यांची पश्चिम महाराष्ट्र विभाग उपाध्यक्षपदी निवड झाली. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष, आमदार सतेज पाटील, शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन चव्हाण, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेश अध्यक्ष योगेश मसलगे-पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
...
ीविद्यार्थ्यांतर्फे वार्षिक शालेय बाजार
कोल्हापूर : नेहरू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, मनपा प्रिन्सेस पद्माराजे विद्यालय, क्रिसेंट प्रायमरी स्कूलतर्फे मुस्लीम बोर्डिंग येथे विद्यार्थ्यांनी वार्षिक शालेय बाजार भरवला. या बाजारात सुमारे पन्नास हजार रुपयांची उलाढाल झाली. विद्यार्थ्यांनी पाणीपुरी, नुडल्स, आप्पे, समोसा, मटण बिर्याणी, पास्ता, शाबू वडा, आंबोळी, वडे आदी पदार्थांचे स्टॉल लावले होते. मुस्लीम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. अमीर गारदी, राजूभाई नदाफ, रियाजभाई बागवान, दिलावर पठाण, हाजी इर्षाद बंडवल, रियाज रुकडीकर, मलिक इलाई बागवान, हाजी जहाँगीर अत्तार, हाजी लियाकत मुजावर, मुस्लीम बोर्डिंगचे संचालक रफीक शेख, शिक्षक प्रतिनिधी आर. डी. पाटील, नेहरू हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. काझी, पद्माराजे शाळेचे मुख्याध्यापक अमित जाधव, शिक्षकेतर प्रतिनिधी डी. एन. देसाई आदी उपस्थित होते.
...
‘कंपनी सेक्रेटरी’तर्फे व्यवस्थापन समितीची निवड
कोल्हापूर : द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे संस्थेच्या कोल्हापूर विभागासाठी २०२३-२६ करीता व्यवस्थापन समितीची निवड झाली. संस्थेचे देशात ६५ हजारपेक्षा जास्त सदस्य आहेत. कोल्हापूर विभागासाठी पदाधिकारी म्हणून सीएस कपिला टिक्के यांची अध्यक्ष, सीएस सचिन बिडकर यांची उपाध्यक्षपदी, सचिव म्हणून सीएस जयदीप पाटील, तसेच खजानिसपदी सीएस स्वप्नील पाटोळे यांची निवड झाली. कमिटी सदस्य सीएस प्रवीण निंगनुरे, सीएस जोतिबा गावडे, कार्यालयीन प्रमुख राजश्री लंबे, रिया कारेकर उपस्थित होते.
...
खाटिक समाजातर्फे गुरुवारी कार्यक्रम
कोल्हापूर : खाटिक समाजातर्फे गुरुवारी (ता. २६) हळदी-कुंकू समारंभ होणार आहे. सायंकाळी चार वाजता होणाऱ्या कार्यक्रमासाठी सभासद भगिनींनी स्वत:चे आधारकार्ड झेरॉक्स देऊन वाणाचे कूपन घेऊन जावे, असे आवाहन चिटणीस जयदीप घोटणे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
...
राजर्षी शाहू कॉलेजमध्ये कार्यशाळा
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत समाजशास्त्र विभागातर्फे कौटुंबिक हिंसाचारावर आधारित एक दिवसीय कार्यशाळा झाली. अग्रणी महाविद्यालय योजना समितीचे सदस्य डॉ. ए. एस. बन्ने यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. डॉ. बन्ने यांनी कौटुंबिक हिंसाचाराची मांडणी केली. प्राचार्य डॉ. एल. डी. कदम अध्यक्षस्थानी होते. डॉ. ए. आर. कांबळे यांनी कौटुंबिक हिंसाचाराचा आढावा घेतला. या सत्राचे अध्यक्ष ‘वाय.सी.के.एम.सी.’चे सहाय्यक प्रा. डॉ. बी. एम. पाटील होते. शहाजी लॉ कॉलेज येथील सहाय्यक प्रा. डॉ. ए. पी. पाटील यांनी कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ विद्यार्थ्यांना समजावून दिला. प्रा. डॉ. ए. ए. गावडे यांनी महिला सक्षमीकरण यावर व्याख्यान दिले. एस. आर. माजगावकर, डॉ. एस. ए. फरास, डॉ. एस. एस. लवेकर, डॉ. एन. ए. देसाई, श्रीमती एन. डी. येडेकर, एस. पी. मुलाणी, उपप्राचार्या प्रा. डॉ. एस. जे. आवळे, उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार यांचे सहकार्य लाभले. समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. के. कन्नाडे समन्वयक होते. एस. डी. मुरकर यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एम. डी. कदम यांनी आभार मानले.
-
77811
रामराव गुजर यांची निवड
कोल्हापूर : दी भोईराज फिशरीज्‌ सोसायटीच्या अध्यक्षपदी रामराव गुजर यांची निवड बहुमताने झाली. शासकीय अधिकारी ए. ए. चिकणे यांनी निवडीची प्रक्रिया पार पाडली. संचालक दिलीप आयरे, प्रा. एकनाथ काटकर, राजेंद्र नलवडे, सुभाष आयरे, गणपत नलवडे, किसन काटकर, किरण बागडी, सचिव संजय काटकर आदी उपस्थित होते. निवडीनंतर गुजर यांचे अभिनंदन करण्यात आले.

ेे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com