‘सरपंच’च्या २३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

‘सरपंच’च्या २३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

‘सरपंच’च्या २३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
गडहिंग्लज तालुका : सदस्यच्या ५१ उमेदवारांचीही अनामत सरकारी तिजोरीत
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरमध्ये झाल्या. सरपंच पदाची निवडणूक लढवलेल्या ८७ पैकी २३ उमेदवारांचे डिपॉझिट रक्कम सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत. त्यासोबत विविध गावांतील ५१ सदस्यपदाच्या उमेदवारांचीही अनामत जप्त झाली आहे.
प्रत्यक्ष लढतीमध्ये निवडून न आलेल्या उमेदवाराला मिळालेली मते, दिलेल्या एकूण मतांच्या संख्येस निवडून द्यावयाच्या उमेदवारांच्या संख्येने भागल्यानंतर एक अष्टमांशपेक्षा कमी असतील तर अनामत रक्कम राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होते. तालुक्यातील चार बिनविरोध गावे वगळता ३० गावांमध्ये चुरशीने निवडणुका झाल्या. उमेदवारी अर्ज भरताना खुल्या गटातील इच्छुकांना प्रत्येक अर्जामागे ५०० तर आरक्षित जागेवरील इच्छुकाला प्रत्येकी १०० रुपये अनामत रक्कम भरावी लागली. गावची निवडणूक म्हणजे ईर्ष्या, भाऊबंदकी आणि पूर्ववैमनस्य आलेच. यातून परस्पर विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करण्यासाठी एकमेकांनी कंबर कसली होती. डिपॉझिट जप्त करण्यात काहींना यश आले, तर काहींनी विरोधकाला टिच्चून चांगली मते घेतली. सहज बोलतानाही त्याचे डिपॉझिट जप्त करू अशा वल्गनाही गावपातळीवर होत होत्या. यामुळे कोणाचे डिपॉझिट जप्त झाले, याची उत्सुकता अजूनही आहे. तावरेवाडी, हिटणी, वैरागवाडी, डोणेवाडी, बिद्रेवाडी, कळवीकट्टे, जखेवाडी, तारेवाडी, कुंबळहाळ, बेकनाळ, खमलेहट्टी, हसूरसासगिरी, शिप्पूर तर्फ नेसरी या गावातून एकाही उमेदवाराचे अनामत जप्त झालेले नाही.
-----------------
* अनामत जप्त सरपंचपदाचे उमेदवार
महागाव : शिवाजी माने, हरळी खुर्द : काशिनाथ कांबळे, अभिजित चव्हाण, शिवानी कांबळे, राजेंद्र कांबळे, हर्षदा कांबळे, येणेचवंडी : सुषमा ऐवाळे, सरोळी : साधना कांबळे, काळामवाडी : सरिता हेळवाडकर, हिडदुग्गी : किशोर तराळ, हडलगे : गावडू पाटील, यमेहट्टी : जनाबाई गावडा, कुमरी : शोभा अडाली, दिपाली पोळकर, भडगाव : राधिका सावेकर, कडगाव : मेघा पाटील, करंबळी : संतोष देवेकर, मुगळी : बाळाप्पा कांबळे, नेसरी : आनंदी नाईक, सांबरे : कविता कोले, वैजयंता पाटील, बड्याचीवाडी : राजेंद्र दळवी, हसूरवाडी : अनुराधा गिरी.
--------------------------------------------

* दृष्‍टिक्षेपात अनामत रक्कम
- अर्ज दाखल (सरपंचासह सदस्य) : १२६३
- अनामत रक्कम जमा : ४, ६५, १००
- रिंगणातील उमेदवार : सरपंच-८७, सदस्य-५८७
- डिपॉझिट जप्त उमेदवार : सरपंच-२३, सदस्य-५१
- जप्त रक्कम : ३० हजार २००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com