‘पठाण’विरोधात इचलकरंजीत निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पठाण’विरोधात इचलकरंजीत निदर्शने
‘पठाण’विरोधात इचलकरंजीत निदर्शने

‘पठाण’विरोधात इचलकरंजीत निदर्शने

sakal_logo
By

ich256.jpg
78243
इचलकरंजी : पठाण चित्रपट प्रदर्शित करू नये, यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे निदर्शने केली.
----------------
‘पठाण’विरोधात इचलकरंजीत निदर्शने
इचलकरंजी, ता. २५ : पठाण चित्रपटात हिंदू बांधवांच्या भावना दुखवणारी दृश्ये असल्याने चित्रपट प्रसारीत करू नये, अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे केली होती. मात्र काही चित्रपटगृहांनी तो लावण्याचा निर्णय घेतला होता. तो प्रदर्शित होवू नये यासाठी बुधवारी शहरातील सर्व चित्रपटगृहाबाहेर विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे आंदोलन केले.
इचलकरंजीमध्ये हा चित्रपट लाऊ नये यासाठी अगोदरच बजरंग दलातर्फे निवेदन दिले होते. पण काही चित्रपट गृहामध्ये ऑनलाईन बुकिंग होत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. कार्यकर्ते पहिल्याच शोला चित्रपटगृहात जाऊन निदर्शने व घोषणाबाजी केली. चित्रपट बंद पाडावा अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला आला. यानंतर तेथील प्रशासनाने आज चित्रपट प्रदर्शीत करणार नाही असे घोषित केले. आंदोलनात राजकरन शर्मा, सुजित कांबळे, मुकेश दायमा, अमित कुंभार, आनंद मकोटे, अमोल शिरगुप्पे, रावसाहेब चौगुले, बाळासाहेब ओझा, प्रवीण सामंत, सर्जेराव कुंभार आदी उपस्थित होते.