
गेट टुगेदर
79319
कोल्हापूर : चाळीस वर्षांपूर्वीचे मित्र स्नेहमेळाव्यानिमित्त एकत्र आले.
चाळीस वर्षांनंतर भेटले बालमित्र
कोल्हापूर : तब्बल ४० वर्षांनंतर बापट कॅम्प येथील अवघड मित्र मंडळाच्या सदस्यांच्या स्नेहमेळाव्याच्यानिमित्त बालमित्र भेटले. मेळाव्यात एकमेकांचा पुनर्परिचय करत दोन दिवस आनंदी वातावरणात घालवले. बापट कॅम्प येथे कुंभार समाज आणि वीज मंडळाचे कर्मचारी वास्तव्यास होते. तिथे अवघड मित्र मंडळाची स्थापना १९८३ मध्ये झाली. मंडळाच्या माध्यमातून सण, उत्सव साजरे केले जात. मुले मोठी होऊन कामानिमित्त बाहेर पडली. कर्मचारीही बदली होऊन परगावी गेले. त्यातील नितीन भिसे, प्रसाद चांदेकर, राजु घाटगे यांनी पुढाकार घेऊन सर्वांचे संपर्क क्रमांक मिळविले. पन्नासहून अधिक जुने सहकारी भेटले. मेळाव्यात एकमेकांचा परिचय करून दिला. कुटुंबीयांच्या माहितीची देवाणघेवाण झाली. अनेक सदस्यांनी गाणी सादर करत आनंदात रंग भरला. एकत्रित डान्स केला. आठवणींना उजाळा देताना अनेकजण भावनाविवश झाले. आठवण म्हणून स्मृतिचिन्ह भेट दिले. प्रसाद चांदेकर, ज्ञानेश्वर येसाते, राजू घाटगे, सुधीर पिश्ते, बाहुबली खोत, अशोक घेवडे यांनी प्रयत्न केले.