अंधामधील क्षमतांचा विकास करायला हवा

अंधामधील क्षमतांचा विकास करायला हवा

ajr291.jpg
78916
आजरा : येथील अंधासाठी स्वयंसिद्धता कार्यशाळेचे उद्‍घाटन रोपाला पाणी घालून करताना स्वागत थोरात. स्वरुपा देशपांडे, डॉ. सदानंद पाटणे, डॉ. शिवशंकर उपासे आदी.
-----------------------
अंधामधील क्षमतांचा विकास करायला हवा
स्वागत थोरात ः आजऱ्यात अंधांसाठीच्या कार्यशाळेला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २९ ः अंध माणसांकडे समाजाचा पाहण्याचा दृष्‍टिकोन बदलत आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण हा दृष्‍टिकोन पूर्णतः बदलला आहे असेही म्हणता येत नाही. डोळस माणसाप्रमाणे अंधामध्ये क्षमता असतात. या क्षमतांचा विकास करायला हवा. यासाठी डोळस व अंध व्यक्तींनी एकत्रित आले पाहिजेत, असे मत ब्रेल मॅन ऑफ इंडिया स्वागत थोरात यांनी केले.
येथील विद्यावर्धिनी व जे. पी. नाईक पतसंस्थेच्या सभागृहात आजपासून दोन दिवसांच्या अंधांसाठी स्वयंसिद्धता कार्यशाळेला प्रारंभ झाला. या कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी श्री. थोरात यांनी मार्गदर्शन केले. या वेळी तालुक्यातील अंध व्यक्ती व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. जे. पी. नाईक संस्थेचे अध्यक्ष व साहित्यिक डॉ. शिवशंकर उपासे, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सदानंद पाटणे, कार्यशाळा मार्गदर्शक स्वरुपा देशपांडे, येथील पंचायत समिती आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक जे. सी. भोईर प्रमुख उपस्थित होते. मरणोत्तर नेत्रदान चळवळीच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
मरणोत्तर नेत्रदान चळवळीचे प्रमुख पदाधिकारी अवधुत पाटील यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबाबतची भूमिका मांडली. श्री. थोरात म्हणाले, ‘‘अंध व्यक्तीच्यामध्ये डोळस व्यक्तीप्रमाणे क्षमता असतात. त्या क्षमता ओळखून त्याचा विकास करायला हवा. नातेवाईकांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. समाजाने पाठबळ द्यायला हवे. त्यांच्यातील क्षमतांचा विकास झाल्यास ते सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगू शकतील.’’ डॉ. उपासे म्हणाले, ‘‘अंध व्यक्तीही समाजाचा घटक आहेत. त्यांना समजावून घेणे व मदत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. डॉ. पाटणे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी नेत्रदान चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवीण देसाई यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
चौकट-
* अंधाना आत्मविश्वासाचे बळ
कार्यशाळेच्या आजच्या पहिल्या दिवशी पांढरी काठी घेऊन चालणे, एकाग्रता वाढणारे खेळ व विविध व्यायाम प्रकार शिकवण्यात आले. यातून अंधाचा आत्मविश्वास वाढीसाठी बळ मिळाले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
रणजित कालेकर.........................................................आजरा.........................................................ता. 28

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com