सकाळ IN सत्कार

सकाळ IN सत्कार

‘सकाळ’ तरुण नेतृत्व घडवतयं
खासदार धनंजय महाडिक : यिन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : ‘सकाळ’ यंग इन्सिरेटर्स नेटवर्कच्या (यिन) माध्यमातून राज्यातील तरुण नेतृत्व घडवले जात आहे. राजकारणात भवितव्य करणाऱ्या तरुणांना यिन हे माध्यम निश्‍चित फायद्याचे ठरत असल्याचे मत खासदार धंनजय महाडिक यांनी आज व्यक्त केले. मेरी वेदर मैदानावर सुरू असलेल्या भिमा कृषी प्रदर्शनात आज सांगता झाली. महाविद्यालयातील नूतन यिन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
खासदार महाडिक म्हणाले, ‘पूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या निवडणुकीत सहभाग घेवून राजकारणात प्रवेश करता येत होता. आता या निवडणुका होत नाहीत. ‘सकाळ यिन’मुळे तरुणांना सकारात्मक राजकारण करण्याचे चांगले माध्यम मिळाले आहे. ‘सकाळ’चा हा उपक्रम निश्‍चितपणे फायदाचा ठरणार आहे. ‘सकाळ’ राजकारणासह सामाजिक कार्यालयात चांगले युवक घडविण्याचे काम करत आहे. ज्या तरुणांना राजकारणाची सुरुवात करायचे आहे, अशा तरुणांनी यिन सारख्या निवडणुकीत सहभाग घेतला पाहिजे. कोल्हापूरमध्ये नुकत्याच या निवडणुका झाल्या. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. त्यामुळे कृष्णराज महाडिक यांनीच यिनमध्ये विजयी झालेल्या तरुणांना पाठबळ द्यावे आणि त्यांचा सत्कार करावा, असे सूचवले होते. त्यानुसार हा सत्कार केला जात आहे.’
कृष्णराज महाडिक म्हणाले, ‘यिनमुळे विद्यार्थांचा आणि भविष्यात राजकारण करणाऱ्या तरुणांचा सर्वांगिण विकास होणार आहे. त्यांना सकारात्मक राजकारणाचे धडे मिळणार आहेत. ‘सकाळ’ने चांगले माध्यम दिले आहे. तरुणांनी यामध्ये राजकीय हस्तक्षेप न आणता स्वबळावर आणि खेळीमेळीचे राजकारण करत आपला विकास करुन घेतला पाहिजे.’ दरम्यान, फुटबॉल, रग्बी, नेमबाजी, जलतरणसह विविध खेळात प्राविण्य मिळवलेल्या खेळाकडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळ, क्रीडा उपसंचालक संजय सबनिस, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, भारती विद्यापीठ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल चव्हाटे, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार, भिमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्‍वराज महाडिक, कृष्णराज महाडिक, यिन विभाग प्रमुख अवधूत गायकवाड, शेजल शेंडगे, शर्वरी बामणे, ओंकार जगताप, अभिषेक माने, अनिरुध्द इंगळे उपस्थित होते.
....

‘यिन’ च्या या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
अभिषेक पाटील (अध्यक्ष) व सुयश राणे (उपाध्यक्ष) शासकीय तंत्रनिकेतन. प्रतिक पाटील (अध्यक्ष) व वैष्णवी प्रभू (उपाध्यक्ष) तात्यासाहेब कोरे इनस्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी. साईराम पाटील (हॉटेल मॅनेजमेंट ॲण्ड केटरिंग). श्रेया चौगुले (अध्यक्ष) व समृध्दी टिपुगडे (उपाध्यक्ष) सायबर महिला महाविद्यालय. पार्थ सावंत (अध्यक्ष) व यश भांदुरगे (उपाध्यक्ष) भारती विद्यापीठ, न्यू लॉ कॉलेज. आदित्य जाधव (अध्यक्ष) व शिवतेज देसाई (उपाध्यक्ष) भारती विद्यापीठ फार्मसी कॉलेज. हनन पटेल (अध्यक्ष) व मोहम्मद इनामदार (उपाध्यक्ष) उर्दू डी.एल.एड. कॉलेज. ज्ञानेश्र्वर शिंदे (अध्यक्ष) केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालय. राजलक्ष्मी कदम (अध्यक्ष) कमला कॉलेज.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com