महाविद्यालयात घाळींना श्रद्धांजली

महाविद्यालयात घाळींना श्रद्धांजली

महाविद्यालयात घाळींना श्रद्धांजली
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात श्रीमती रत्नमाला घाळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी घाळींच्या कार्याचा आढावा घेतला. विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव गजेंद्र बंदी यांनी घाळी या संस्काराचे विद्यापीठ होत्या, असे सांगितले. अनिल उंदरे, एस. ए. मस्ती, दत्ता पाटील, ओंकार खतकल्ले, शशिकांत संघराज, एम. डी. पुजारी, सरला आरबोळे, सरोज बिडकर, सचिन जानवेकर, राजश्री पोरे, कार्यालयीन अधीक्षक हरीभाऊ पन्हाळकर आदींनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.
-----------------------------------------
GAD33.JPG
80120
गडहिंग्लज : ओंकार पोवार याचा सत्कार राजन पेडणेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सुरेश चव्हाण, कविता पोळ, प्रकाश कांबळे, सुरेश धुरे उपस्थित होते.

ओंकार पोवारला मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक
गडहिंग्लज : येथील ओंकार संस्थेच्या राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयाचा खेळाडू ओंकार पोवारने पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत ८०० मीटर धावणे प्रकारात सुवर्णपदक मिळवले. त्याची राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाविद्यालय व संस्थेतर्फे त्याचा सत्कार केला. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर, प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण, कनिष्ठ विभागप्रमुख कविता पोळ, प्रकाश कांबळे यांचे प्रोत्साहन मिळाले. शारीरिक शिक्षण संचालक सुरेश धुरे यांचे मार्गदर्शन मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com