पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर दलित वस्‍ती कामांना स्‍थगिती

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर दलित वस्‍ती कामांना स्‍थगिती

जिल्‍हा परिषद ... लोगो
...

पालकमंत्र्यांच्या सूचनेने
दलित वस्‍ती कामांना स्‍थगिती

यादी बदलण्यासाठी हालचाली; याचिका दाखल होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. ३ : समाजकल्याण विभागाने मंजूर केलेल्या दलित वस्‍तीच्या यादीला स्‍थगिती देण्यात आली आहे. पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यां‍नी हे आदेश दिले आहेत. त्याबाबतचे पत्र सर्व गटविकास अधिकारी यांना पाठवण्यात आले असून, त्याची प्रत आता ग्रामपंचायतींना पोहोचली असल्याने गावागावांत गोंधळ सुरू झाला आहे.

जिल्‍हा परिषदेच्या समाजकल्याण समितीला दलित वस्‍तीच्या विकासासाठी ३६ कोटी मंजूर झाले आहेत. राज्यातील सत्ता बदल झाल्यानंतर लगेचच या निधी वाटपाचा निर्णय झाला. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्‍हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपास मान्यता घेण्यात आली. ज्या गावांना आजपर्यंत लाभ मिळाला नाही, प्राधान्याने त्या गावांना निधी मंजूर करण्यात आला. जिल्‍हा परिषदेच्या वेबसाईटवरही ही यादी झळकली. गावागावांत निधीचे फलक लागले. काही हुशार लोकप्रतिनिधींनी ठराव करून निधीला तांत्रिक, प्रशासकीय मान्यता घेऊन टेंडर प्रक्रिया राबवली. काही गावांनी कामातही आघाडी घेतली आहे.

दलित वस्‍तीची कामे मार्गी लागत असतानाच पालकमंत्री केसरकर यांनी दलित वस्‍ती निधीवरून समाजकल्याण अधिकाऱ्यां‍वर ताशेरे ओढले. तसेच यात बदल करण्याच्या सूचना दिल्या. अजूनही यात बदल होण्याची किंवा नव्याने सूचना येण्याची शक्यता असल्याने जिल्‍हा परिषदेने या यादीला स्‍थगिती दिली आहे. या यादीला स्‍थगिती मिळाल्याने गावागावांत संतप्‍त पडसाद उमटत आहेत. यातूनच न्यायालयीन वाद उद्‌भवण्याची शक्यता आहे.
....

यादी रद्द करण्यासाठी बैठक

सर्किट हाऊस येथे आज दलित वस्‍तीच्या कामांना स्‍थगिती देण्यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये यादीत बदल करण्यावर व नवीन यादी करण्यावर चर्चा करण्यात आली. यात कोणत्या नेत्यांची कामे समाविष्ट करावी, कोणाची कामे वगळावी यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा वाद न्यायालयात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com