अल्पवयीन मुलीवर अत्याचार एकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार एकावर गुन्हा दाखल

फोटो
...

कसबा बावड्यातील तरुणाला अटक

अल्पवयीन मुलीशी अनैसर्गिक कृत्य ः पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतल्यावर गुन्हा दाखल


कोल्हापूर, ता. ३ ः अल्पवयीन मुलीशी अनैसर्गिक व अश्‍लील चाळे केल्याप्रकरणी कसबा बावडा येथील तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. महेश संजय पाटील (वय ३१, रा. राजाराम कॉलनी, शुगर मिलजवळ, कसबा बावडा, मूळ रा. शिवाजी कॉलनी, प्लॉट नं. १०, लाईन बाजार, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी या धुणी भांडी आणि हॉस्पिटलमध्ये साफसफाईचे काम करतात. संशयित आरोपीने फिर्यादीशी प्रेमसंबंध ठेवले. तसेच फिर्यादी यांची पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे. याची माहिती संशयित आरोपीला असतानाही त्याने तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. ती घरी एकटीच असताना तो घरामध्ये येत होता. तेथे पीडित मुलीला मोबाईलवर अश्‍लील व्हिडिओ दाखवून तिच्याशी अश्‍लील वर्तन केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बालकाचे लैंगिक, अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे सुधारित अधिनियम २०१६ च्या काही कलमांनुसार हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुनीता शेळके अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, संबंधित अल्पवयीन पीडितेवर अत्याचार होत असल्याची माहिती एका संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी यावर आवाज उठवीत थेट पोलिस अधीक्षक यांच्याकडे ही माहिती पोचविली. तेथे पीडित अल्पवयीन आणि तिच्या आईने सविस्तर माहिती दिल्यानंतर याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com