आमदार जयश्री जाधव

आमदार जयश्री जाधव

80443
कोल्हापूर : शहरातील प्रभाग क्रमांक ५५ पद्माराजे उद्यान व प्रभाग क्रमांक ४७ फिरंगाई तालीम अंतर्गत विविध विकासकामाच्या उद्‌घाटन करताना आमदार जयश्री जाधव. शेजारी मान्यवर.

ड्रेनेज लाईनचा प्रश्‍न
कायमस्वरूपी सोडवू
आमदार जयश्री जाधव; पद्माराजे उद्यान, फिरंगाई परिसरात कामांचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : शहरातील ड्रेनेज लाईन बदलण्याचा परिपूर्ण प्रस्ताव दिला असून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच निधी मिळून शहरातील ड्रेनेज लाईनची कामे सुरू होतील. त्यानंतर शहरातील ड्रेनेज लाईनचा प्रश्‍न कायमस्वरूपी निकालात निघेल, असा विश्‍वास आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केला. पद्माराजे उद्यान व फिरंगाई तालीम अंतर्गत विविध विकासकामाच्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
प्रभाग क्रमांक ५५ पद्माराजे उद्यान अंतर्गत खंडोबा देवालय परिसरातील ड्रेनेज लाईन, बापू ग्रुप येथील काँक्रिट पॅसेजचे काम सुरू केले. तसेच ठिकठिकाणी गटर्ससह प्रभाग क्रमांक ४७ फिरंगाई तालीम अंतर्गत फिरंगाई काळकाई मंदिरजवळ ऑरेंज हॉस्पिटल ते आर. के. ड्रेसर्स येथे विकासकामांना प्रारंभ झाला. काळकाई मंदिर ते महालक्ष्मी क्लिनिक व कावळेकर घर ते ओंकार ग्रुप येथे ड्रेनेज लाईनच्‍या कामाचे उद्‌घाटन केले.
या वेळी माजी नगरसेवक विक्रम जरग, अजित राऊत, उत्तम कोराणे, आर. डी. पाटील यांच्यासह अजय इंगवले, महेश चौगुले, मनोज पाटील, शेखर पोवार, सुरेश पाटील, संपत चव्हाण, मोहन ससे, नितीन खानापूरकर, माणिक खांडळेर, प्रदीप नागावकर, प्रकाश निरुयेकर, बंडोपंत देवकर, महादेवराव धाडम, रमेशचंद्र काळेसकर, अरविंद ससे, प्रदीप कुलकर्णी, अनुप काळे, सरिता काळे, मीरा ससे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व भागातील नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com