केडीसीसीच्या अधिकाऱ्यांचे बँकेत जल्लोषी स्वागत

केडीसीसीच्या अधिकाऱ्यांचे बँकेत जल्लोषी स्वागत

80466
...

केडीसीसीच्या ‘त्या’ अधिकाऱ्यांचे जल्लोषी स्वागत

कर्मचाऱ्यांकडून पुष्पवृष्टी ः आमदार मुश्रीफ यांनीही केली अधिकाऱ्यां‍शी चर्चा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ४ : ईडीने चौकशीसाठी समन्स लागू करून मुंबईला नेलेल्या केडीसीसी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांचे बँकेत जल्लोषी स्वागत करण्यात आले. बँकेच्या केंद्र कार्यालय आणि कोल्हापूर शहरातील शाखांमधील कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, साखर विभागाचे व्यवस्थापक आर. जे. पाटील, सहायक व्यवस्थापक अल्ताफ मुजावर, निरीक्षक सचिन डोणकर व निरीक्षक राजू खाडे यांच्यावर पुष्पवृष्टी केली. दरम्यान, बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनीही या अधिकाऱ्यां‍ची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी बोलताना बळीराम पाटील म्हणाले, ‘ईडीने घातलेला हा घाला निव्वळ केडीसीसी बँकेवर नसून तो सहकार क्षेत्रावर आणि समस्त शेतकऱ्यांवरच घातलेला घाला आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी हा घाला परतून लावूया.’ अतुल दिघे म्हणाले, ‘केडीसीसी बँकेचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्याकडून लेखापरीक्षण झाले असतानाही ईडीची ही रेड म्हणजे निव्वळ सूडबुद्धी आहे. अशा प्रकाराने सहकार आणि शेतकरीच उद्‌ध्वस्त होईल. त्यामुळे असे प्रकार थांबणे आवश्यक आहे.’

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने म्हणाले, ‘केडीसीसी बँक हे एक कुटुंब आहे. या प्रसंगात केडीसीसी बँकेच्या जिल्हाभरातील सर्वच कर्मचाऱ्यांनी एकसंघपणे पाठबळ दिले. त्यामुळे आम्हा सर्वांचे आणि आमच्या कुटुंबीयांचे मनोबल टिकून राहिले.’ यावेळी संचालक मंडळातील कामगार प्रतिनिधी दिलीप लोखंडे, इम्तियाज मुन्शी यांच्यासह कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, ईडीने या अधिकाऱ्यां‍चे पुन्‍हा एकदा जबाब घेतल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com