बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम

बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम

बचत गट फोटो वापरणे
-------------------
बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम
इचलकरंजीत चार पंधराशे गट सक्रिय; उद्योगातील धाडस वाढण्यास मदत
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ५ : बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अनेक संधी उपलब्ध होत आहेत. त्यामधून त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होत आहे. इचलकरंजी शहरात ही चार हजार हून अधिक महिला बचत गट असून त्यामधील पंधराशे गट सक्रिय आहेत. या गटांच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार निर्मिती झाली आहे. एकंदरीत बचत गटांमुळे शिक्षित महिलांसह अशिक्षित महिला ही सक्षम होताना दिसत आहेत.
इचलकरंजी शहर वस्त्रनगरी म्हणून प्रसिद्ध असले तरी शहरात इतर व्यवसायांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी येथील महिला बचत गटांच्या महिलांना अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होत आहेत. महिलांना स्वयंरोजगार मिळत असून उद्योगातील धाडस वाढण्यास मदत होत आहे. शहरातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी विविध पदार्थांची दालने सुरू केली आहेत. यामध्ये सॅनिटरी नॅपकिन बनवणे, लहान मुलांसाठी कपड्याचे डायपर बनवणे, लिंबापासून टॉयलेट क्लीनर फेसवॉश व साबण तयार करणे, सोयाबीनपासून पापड, चिवडा, पनीर वस्तु तयार करणे, कागद आणि कापडापासून पिशव्या तयार करणे, टाकाऊ प्लास्टिकपासून विविध वस्तू तयार करणे आदी व्यवसायांचा समावेश आहे.
महिला शिक्षित असो की अशिक्षित मात्र त्याच्यामध्ये गृहिणीचे प्रमाण अधिक असते. बचत गटांमुळे ही परिस्थिती बदलत असून महिलांना स्वयंरोजगार मिळत आहे. संघटित व्यवसाय सुरू करीत असल्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढत आहे. प्रशासन ही महिलांच्या अंगी असलेल्या गुणांना समाजात प्रसिद्धी मिळावी व त्यामधून महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी विविध योजना राबवत आहे. तसेच बॅंकांच्या माध्यमातून महिला बचत गटांना ५० हजार ते ५ लाखापर्यंतचे अत्यल्प व्याज दराने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामधून महिलांना बॅंकींग क्षेत्रातील व्‍यवहाराची माहिती मिळत आहे. सोबत त्या उद्योजक म्हणून पुढे येत आहेत.
-----------
सावकार, छोट्या फायनान्स कंपन्यांचा शिरकाव
महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला सक्षम होत असताना काही सावकारी करणारे छोट्या फायनान्स कंपन्या आकर्षित झाल्या आहेत. महिलांच्या गटाला १० हजार ते १ लाख रुपये कर्ज स्वरुपात देत आहेत. यासाठी केवळ आधारकार्ड व शिधापत्रिका घेत आहेत. मात्र याचे व्याजाचे प्रमाण ही अधिक असून वसूली ही पठाणी असल्याने महिला बचत गटांना दक्षता घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
-------------
बचत गटाचे फायदे
*महिलांचे संघटन होते
*बचत आणि काटकसरीची सवय लागते
*तातडीच्या गरजा भागविण्यासाठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत नाही
*महिलांना बँकेचे व्यवहार माहिती होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com