बावडेकर पुस्तक प्रकाशन

बावडेकर पुस्तक प्रकाशन

‘पंत अमात्य बावडा दप्तर''
ग्रंथाचा उद्या प्रकाशन सोहळा

कोल्हापूर, ता. ६ : हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्या ३०७ व्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी (ता.८) इतिहास अभ्यासक डॉ. केदार फाळके यांचे व्याख्यान होणार आहे. ‘रामचंद्रपंत अमात्य लिखित आज्ञापत्र : श्री शिवछत्रपतींचा राजनीत’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असेल. या वेळी ‘पंत अमात्य बावडा दप्तर’ ग्रंथाचेही प्रकाशन होईल. श्रीमंत माईसाहेब बावडेकर शाळेतील श्री रामचंद्रपंत अमात्य सभागृहात सायंकाळी साडेपाचला हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ''ट्रस्टचे सचिव नीलराजे पंडित-बावडेकर, उपाध्यक्ष डॉ. अमर अडके यांनी पत्रकार परिषदेत केले.
ग्रंथामध्ये गगनबावडा जहागिरीतील १६६० ते १७४८ या काळातील ऐतिहासिक कागदपत्रांचा संग्रह आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, रामचंद्रपंत अमात्य, सेनापती संताजी घोरपडे यांची पत्रेही आहेत. कार्यक्रमाला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची प्रमुख उपस्थिती असेल तर ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी असतील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांचीही उपस्थिती असेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विश्वनाथ कोरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com