
जाहिरात- मलाबार गोल्डतर्फे ४२ लाखांची शिष्यवृत्ती
81179
मलाबार गोल्डतर्फे
४२ लाखांची शिष्यवृत्ती
जिल्ह्यातील ४५४ विद्यार्थिनींना वितरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः येथील मलाबार गोल्ड अँड डायमंडसकडून सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यातील ४५४ विद्यार्थिनींना ४२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिष्यवृत्तीचे वितरण झाले. ‘सीएसआर’ निधीतून या शिष्यवृत्ती देण्यात आली असून, राजर्षी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला.
मलाबार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्तीचा हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार आमदार जाधव यांनी काढले. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, वरिष्ठ पोलिस अधिकारी तानाजी सावंत, निवृत्त वरिष्ठ परिवहन अधिकारी पी. डी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर मलाबार गोल्ड शाखेचे प्रमुख आबीद, स्टोअर मॅनेजर रवींद्र पाटील, मार्केटिंगप्रमुख जमीर महांबी, सय्यद मुजावर आदी उपस्थित होते.