सुपर अभिनव अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे जेईईमध्ये यश

सुपर अभिनव अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे जेईईमध्ये यश

gad101.jpg
81705
आजरा : सुपर अभिनव अॅकॅडमीतर्फे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रा. सुधीर मुंज, प्रा. एस. बी. पाटील, डॉ. अमोल पाटील उपस्थित होते.
----------------------------

सुपर अभिनव ॲकॅडमीच्या
विद्यार्थ्यांचे ‘जेईई’मध्ये यश
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : येथील सुपर अभिनव सायन्स ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षेत यश मिळविले. पहिल्या सत्रातील परीक्षेतून २६ विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरले. या विद्यार्थ्यांची शहरातून मिरवणूक काढून आनंद साजरा करण्यात आला.
आयआयटी व एनआयटी प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर जेईई मेन्स परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या पहिल्या सत्रात सुपर अभिनवच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. विद्यार्थ्यांचा आजरा येथे झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. प्रा. सुधीर मुंज यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते हर्षवर्धन मटकर (९८.८८), प्रणव शेवाळे (९८.०७), वैभव गुरव (९७.८६), मेघा मातवंडकर (९७.७०), स्वरूप तोडकर (९७.१९), सानिका सुरंगे (९५.४८), आर्या पवार (९४.२०), शुभम पाटील (९२.६८), चैतन्य शिंगटे (९२.२५), संयोगिता चव्हाण (९०.८३), खुशी बांदेकर (९०.५२), रवी वाइंगडे (९०.२८), हर्षद कवडे (८९.८३), तनिष्क खोराटे (८९.५९), प्रवीणा चौगुले (८९.३८) या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल प्रा. मुंज यांनी कौतुक केले. सुपर अभिनव ॲकॅडमीचे संचालक प्रा. एस. बी. पाटील, डॉ. अमोल पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांची ढोल-ताशांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com