अपर तहसीलसाठी स्वतंत्र रेकॉर्ड विभाग

अपर तहसीलसाठी स्वतंत्र रेकॉर्ड विभाग

अपर तहसीलसाठी स्वतंत्र रेकॉर्ड विभाग
हातकणंगलेमध्ये स्वतंत्र कर्मचारी; नागरिकांचे हेलपाटे कमी होणार
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १० : इचलकरंजी शहरात सप्टेंबर २०१९ मध्ये अपर तहसील कार्यालय सुरू केले. मात्र, यावेळी रेकॉर्ड विभाग हातकणंगलेमध्येच होते. तालुक्याचे रेकॉर्ड एकत्रित आल्याने जुने ७/१२ उत्तरे, इनाम पत्रक, क, ड, ई पत्रक, जुने फेरफार उतारे, चौकशी उतारे आदींसह अन्य महसूल पुरावे मिळवण्याठी नागरिकांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. मात्र, सध्या अपर तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावांचे रेकॉर्ड वेगळे करण्याचे सुरू आहे. हातकणंगले येथील प्रशासकीय इमारतीमध्ये स्वतंत्र विभाग असणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांचे हेलपाटे कमी होणार आहेत.
शहरातील अपर तहसील कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात हुपरी, रुई, कबनूर आणि इचलकरंजी ही चार मंडल कार्यालय येतात. यांच्या अंतर्गत चंदूर, कबनूर, कोरोची, तारदाळ, खोतवाडी, हुपरी, रेंदाळ, तिळवणी, साजणी, जंगमवाडी, पट्टणकडोली, रुई, इंगळी आदीसह एकूण २० गावांचा समावेश आहे. या गावांचे सध्याचे कामकाज इचलकरंजी कार्यालयामधून होत आहे. शहरात अपर तहसील कार्यालय सुरू झाल्यानंतर शहर परिसरातील नागरिकांचा त्रास काही प्रमाणात कमी झाला. मात्र, यावेळी अत्यावश्यक असणारे रेकॉर्ड विभाग तालुक्यातच ठेवल्याने पुन्हा नागरिकांची दमछाक होत होती. त्यामुळे रेकॉर्ड विभाग इचलकरंजीमध्ये स्थलांतरित करावे, अशी मागणी जोर धरत होती.
हातकणंगलेमध्ये असलेल्या रेकॉर्ड विभागामधील अपर तहसील कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात आलेल्या गावांचे रेकॉर्ड छाननी करण्यात येत आहे. हे दस्ताऐवज ठेवण्यासाठी हातकणंगले येथील प्रशासकीय इमारतीमध्ये स्वतंत्र विभाग करण्यात येणार आहे. त्यामुळे रेकॉर्ड विभाग हातकणंगलेमध्ये असला तरी येथे केवळ अपर तहसील कार्यालया संबंधित रेकॉर्ड राहाणार आहे. परिणामी नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही.
--------
‘सकाळ’ने वेधले लक्ष
तालुक्यातील काही अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे सुमारे ३०० हून अधिक प्रकरणे प्रलंबित होती. याबाबत ‘सकाळ’ने नागरिकांच्या व्यथा मांडल्या होत्या. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाने प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले होते.
--------
इचलकरंजी अप्पर कार्यालयासाठी स्वतंत्र रेकॉर्ड विभाग होत असल्याने नागरिकांना सोयीचे होणार आहे. आवश्यक दस्ताऐवज तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे. इचलकरंजी शहरात जागेची उपलब्धता झाल्यास रेकॉर्ड विभाग येथे आणला जाणार आहे.
- शरद पाटील, अपर तहसीलदार, इचलकरंजी कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com