दगड घडविणारी बांधकामे भाग १

दगड घडविणारी बांधकामे भाग १

लोगो :
दगडांना आकार देताना- भाग १

81499
कोल्हापूर : मोरेवाडी येथे योगेश पाथरवट हे घरांसाठी दगडांची घडई करताना.

लीड
घरबांधणीत दगडांचा वापर पूर्वापार चालत आला आहे. पूर्वी चौसोपी वाड्यापासून ते खडेपाटची देखणी दगडी घरं आजही आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र दगडांचा घरबांधणीतील वापर खुबीने सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दगडांना विविध आकार देत त्याचा वापर होत आहे. या बदलांचा आढावा घेणारी मालिका आजपासून...


पायाला दगड; इमारतीसाठी सिमेंट, सळी
---
घरबांधणीत दगडांचे महत्त्व कायम; हौसींकडून आवर्जून वापर
अमोल सावंत : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : पूर्वी सर्रासपणे दगडांचा वापर करून घरे उभारली जात होती. कालांतराने घरबांधणीत नवतंत्रज्ञानाचा उदय झाला. घरांच्या निर्मितीला गती आली. तरीही पूर्वीची दगडी घरे १०० वर्षांहून अधिक काळ टिकून असलेली दिसतात. अशा वेळी आजही घरे बांधण्यासाठी दगडांचा वापर केला जात आहे. काही हौशी लोक आवर्जून दगडी घरे बांधताना दिसतात. निदान पूर्ण घरासाठी वाळू, सिमेंट, सळीचा वापर केला असला तरी घराचा पाया हा दगडी घरांचा असावा किंवा घरासाठी काही ठिकाणी दगड असावा, अशी मांडणी करून घरे पूर्ण केली जातात.

महत्त्व आजही कायम
लाव्हारसातून बाहेर पडणारी निरनिराळी खनिजे एकामेकांत मिसळून आणि रासायनिक संयोग होऊन दगड तयार होतो. या दगडांतील खनिजांचे कण एकमेकांशी घट्ट चिकटलेले असल्याने दगडांची भार पेलण्याची क्षमता खूपच जास्त असते. ऊन, वारा, पाऊस, इतर कारणांनी कण सुटे होऊन दगडांची झीज होण्याचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे बांधकामासाठी दगडाची निवड फार पूर्वीपासून केली जात आहे. आजही दगडांचे महत्त्व बांधकामासाठी कमी झालेले नाही, हे लक्षात घ्यायला हवे. भार पेलण्याची क्षमता जास्त असल्याने भारवाही भिंती, धरणांच्या भिंती, अवजड यंत्रांसाठी चौथरे, स्मारकांसाठी, अन्य कारणांसाठी दगडांचा उपयोग केला जातो. घटक खनिजांनुसार दगडांचे गुणधर्म बदलतात. ज्या दगडांच्या मोठ्या चिपा, तुळ्या मिळू शकतात, त्यांचा तुळ्या, खांब या रूपांत उपयोग केला जातो. अगदी पदपथ, रेल्वे आणि बस यांच्या स्थानकांतील फलाट, बंदरातील मालवाहू आणि उतारूंसाठीचे फलाट, घसरणी यासाठीही दगडांची जमीन करतात.
------------
कोट
कोल्हापूर जिल्ह्यात, शहरात दगडी बांधकामे असणारे घर तयार करण्याचे प्रमाण सुमारे पाच टक्के आहे. चिऱ्याच्या दगडांचा वापर करून १५ ते २० टक्के घरे बांधण्याचे प्रमाण दिसते. अशा वेळी वॉल क्लायडिंग किंवा स्टोन क्लायडिंग तंत्रज्ञानाचा वापर करून घरे बांधली जात आहेत. असे वॉल क्लायडिंग दगडी टाईल्स उपलब्ध आहेत. एक फूट बाय सहा इंच आकाराची ही टाईल्स असते. ती जेव्हा घरांसाठी लावली जाते, तेव्हा वॉल क्लायडिंगमध्ये दगडांचा लूक दिसतो. जो लक्षवेधी ठरतो.
- नीलेश चौगुले, बांधकाम व्यावसायिक
--------------
घर बांधण्यासाठी दगडांची घडई करण्यासाठीची चौकशी वाढत आहे. आम्ही दगडांची वेगवेगळ्या मापाने, कॉर्नरनी दगड घडवून देतो. स्क्वेअर फुटांप्रमाणे आम्ही दर देतो. पूर्णपणे निसर्गातील घटक एकत्र करून घर बांधणारे लोक आहेत. दगड हा त्यातील एक घटक. मागणीनुसार आम्ही दगड घडवितो.
- योगेश पाथरवट
(क्रमश:)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com