‘सामूहिक सूर्यनमस्कार’ला उदंड प्रतिसाद

‘सामूहिक सूर्यनमस्कार’ला उदंड प्रतिसाद

ich111,4.jpg
82027
इचलकरंजी : १) ‘सकाळ स्वास्थ्यम’ उपक्रमांतर्गत माई बाल विद्यामंदिराने सहभाग घेतला.
82028
२) संगीताच्या तालावर बालाजी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केले.
82029
३) सोहम योग अकॅडमीने या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत शाहू हायस्कूलमध्ये सूर्यनमस्काराचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व माहिती दिली.
82031
४) इचलकरंजी हायस्कूलच्या मैदानात सूर्यनमस्कार करताना विद्यार्थी.
----------------
‘सामूहिक सूर्यनमस्कार’ला उदंड प्रतिसाद
इचलकरंजीत विद्यार्थी, शिक्षक सहभागी; ‘सकाळ स्वास्थ्यम’ उपक्रमातंर्गत आयोजन
इचलकरंजी, ता. १२ : सकाळ माध्यम समूहाच्यावतीने मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी ‘सकाळ स्वास्थ्यम’ उपक्रमांतर्गत विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग घेऊन उदंड प्रतिसाद दिला. छत्रपती शाहू हायस्कूल, रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन, बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज, माई बाल विद्यामंदिर, इचलकरंजी हायस्कूल या शाळेत ‘सामूहिक सूर्यनमस्कार’ करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार यांचे आरोग्यासाठी होणारे फायदे व महत्त्व समजावून सांगितले.
लहानपणापासून सूर्यनमस्कार घालण्याची सवय राहिल्यास वेगवेगळ्या व्याधींपासून दूर राहावे व आपले स्वास्थ्य चांगले ठेवावे या उद्देशाने सकाळ माध्यम समूहाच्या वतीने शहरातील पाच शाळात सामूहिक सूर्यनमस्कार करण्यात आले. सोहम योग अकॅडमीचे प्रमुख सुहास पवळे व त्यांच्या टीमचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. ‘सकाळ''चे सीनियर एक्झिक्यूटिव्ह संतोष शिंदे यांनी सकाळ स्वास्थ्यम या प्रश्नमंजुषा २०२३ योजनेची माहिती दिली. भावी पिढीला आरोग्याचे महत्त्व कळावे या उद्देशाने सुरू केलेल्या योजनेत विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
माई बाल विद्या मंदिरात योगाच्या राष्ट्रीय खेळाडू प्रज्ञा गायकवाड व सन्मती सगरे यांनी योगाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांकडून सूर्यनमस्कार करून घेतले. संस्थेच्या अध्यक्षा प्रा. सौ. निर्मला ऐतवडे, सचिवा डॉ. मीना तोष्णीवाल, मुख्याध्यापिका सौ. शैला कांबरे, सौ. रजनी घोडके आदी उपस्थित होते. छत्रपती शाहू हायस्कूल व रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमानाने सामूहिक सूर्यनमस्कार झाले. योग तज्ञ व राष्ट्रीय खेळाडू घनशिल लोंढे यांनी सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक शंकर पोवार, विद्यानिकेतनच्या सौ. अलका शेलार, राजेंद्र घोडके, पी. ए. पाटील, क्रीडाशिक्षक तुषार जगताप उपस्थित होते. इचलकरंजी हायस्कूलमध्ये योगशिक्षक सुहास पवळे व स्वराली पलंगे यांनी सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके करून दाखवली. प्राचार्या श्रीमती व्ही. एच. उपाध्ये, पर्यवेक्षक यु. पी. पाटील, उपप्राचार्य ए. बी. पाटील, क्रीडाप्रमुख व्ही. एस. गुरव, क्रीडाशिक्षक डी. वाय. कांबळे, बी. एम. थोरवत आदी उपस्थित होते.
-----------
संगीताच्या तालावर सूर्यनमस्कार
सकाळ माध्यम समूहाच्या आवाहनास प्रतिसाद देत बालाजी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर सामूहिक सूर्यनमस्कार घातले. मुख्याध्यापिका सौ. मंजुषा रावळ यांनी विद्यार्थ्यांन सूर्यनमस्काराचे महत्त्व व जीवनातील उपयोगिता स्पष्ट केली. क्रीडा विभागप्रमुख व योगशिक्षक राजेश चौगुले, उत्तम मेंगने, बाबासो माळी यांनी विद्यार्थ्यांकडून योग्यरीतीने सूर्यनमस्कार करून घेतले. उपमुख्याध्यापक डी. वाय. नारायणकर यांसह सर्व शिक्षक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com