दिलबहार विजयाच्या उंभरट्यावर

दिलबहार विजयाच्या उंभरट्यावर

82092
कोल्हापूर : के.एस.ए. वरिष्ठ फुटबॉल चषक सामन्यात शनिवारी बालगोपाल तालीम विरुध्द दिलबहार तालीम मंडळ यांच्यात सामना झाला. (बी. डी. चेचर : सकाळ छायाचित्रसेवा)

दिलबहार विजयाच्या उंभरट्यावर
१४ अंकासह लीगमध्ये आघाडी; पोलिस संघावर झुंजार क्लबचा विजय
कोल्हापूर, ता. ११ : श्रीमंत शाहू छत्रपती फुटबॉल लीग स्पर्धेच्या विजेतेपदासाठी दिलबहार संघाने दावेदारी सिद्ध केली आहे. ६ व्या फेरी अखेरीस सर्वाधिक १४ गुणांसह दिलबहार तालीम संघ अंकतालिकेत आघाडीवर आहे. आज झालेल्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना एक गोल बरोबरीत राहिला, तर कोल्हापूर पोलिस संघावर झुंजार क्लबने १-० गोल ने विजय मिळवला.
आज झालेल्या दिलबहार विरुद्ध बालगोपाल यांच्यातील सामना एक गोल बरोबरीत राहिला. सामन्याची सुरुवात दोन्ही संघानी आक्रमक केली. दिलबहारच्या स्वयम साळोखे याने सामन्याच्या १७ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामन्यात आघाडी घेतली. तर पाठोपाठ बालगोपाल च्या ऋतुराज पाटील याने २२ व्या मिनिटाला गोल नोंदवत सामना १ - १ असा बरोबरीत आणला. उत्तरार्धात बालगोपाल संघाने आक्रमक चाली रचल्या मात्र दिलबहार च्या बचाव फळीने गोल होऊ दिला नाही. दिलबहार संघाने आक्रमण वाढवत गोल नोंदवण्यासाठी केलेलं प्रयत्न फोल ठरले. अखेरच्या क्षणी गोलजाळी वरून चेंडू गेल्याने संधी वाया गेली. अखेरपर्यंत सामना एक गोल बरोबरीत राहिला.   
कोल्हापूर पोलिस विरुद्ध झुंजार क्लब यांच्यातील सामन्यात झुंजार क्लबने १ - ० गोलने विजय मिळवला. आक्रमक खेळणाऱ्या झुंजार क्लबने सामन्याच्या ६ व्या मिनिटाला आघाडी घेतली. ओमकार भोजे याने हा गोल नोंदवला. उर्वरित संपूर्ण वेळेमध्ये दोन्ही संघाना गोल नोंदवणे शक्य न झाल्याने सामना झुंजार क्लबने जिंकला.
----------
चौकट
सहाव्या फेरीअखेर ‘दिलबहार’ असे...
दिलबहार तालीम मंडळ सहाव्या फेरीअखेर लीगच्या विजेतेपदाच्या उंभरट्यावर आहे. फक्त औपचारिकता राहिलेल्या स्पर्धेमध्ये दिलबहार संघाने सिनियर सुपर आठ गटात सहा सामन्यांपैकी चार विजय, दोन बरोबरी साधली आहे. प्रतिस्पर्धी संघावर १४ गोल नोंदवले असून पाच गोल विपक्षी संघाने नोंदवले आहेत. एकूण नऊ गोल फरक असून १४ गुणांसह तालिकेत सर्वाधिक आहे. सुपर आठ गटामध्ये फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ सहा सामन्यांमध्ये चार विजय, दोन बरोबरी १३ गोल नोंदवले, तीन गोल विपक्षी संघाने नोंदवले अशा १० गोल फरक व १४ गुणांसह गटात आघाडीवर.

आजचे सामने 
दुपारी २ : सम्राटनगर स्पोर्ट्स विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ 
संध्याकाळी ४ : बीजीएम स्पोर्ट्स विरुद्ध संयुक्त जुना बुधवार तालीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com