बदल्या

बदल्या

गुन्हे अन्वेषण शाखेतील
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ११ : शहरासह जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्याबरोबरच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील ११ पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी हे आदेश काढले असून नुकताच काहींना कार्यमुक्तही करण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षकांचे पथक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) भ्रष्टाचारमुक्त आणि कार्यक्षम करण्याचा प्रयत्न पोलिस अधीक्षकांकडून करण्यात येत आहे. शहरातील चार पोलिस ठाण्यांना नवीन पोलिस निरीक्षक मिळाले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेलाही नवीन निरीक्षक मिळाल्यामुळे तेथील ११ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांशी भुदरगड, राधानगरी, गगनबावडा अशा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत.
साधारण वर्षभरापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनीच चक्क पोलिस मुख्यालयाच्या परिसरात लाच घेतल्यामुळे पोलिसांची मोठी बदनामी झाली. हा कलंक पुसून काढण्यासाठी अधीक्षक बलकवडे यांनी तातडीने ‘कलेक्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक पोलिसांच्या बदल्या पोलिस मुख्यालयासह इतर ठिकाणी केल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तत्कालीन निरीक्षकांचीही बदली करण्यात आली होती. त्यामुळे या बदल्यांना विशेष महत्त्व आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com