तारदाळ : स्वच्छता मोहिम
83347
जयवंत महाविद्यालयाची स्वच्छता मोहीम
तारदाळ ः येथील जयवंत महाविद्यालयच्या एनएसएस विभागाच्यावतीने शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर किल्ले पन्हाळगड व जोतिबा येथे श्रमदान करण्यात आले. यावेळी शिवा काशीद समाधी परिसर व पन्हाळगड व जोतिबा डोंगरावरील प्लास्टिक कचरा व पालापाचोळा गोळा करण्यात आला. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. शांताराम कांबळे, प्रा. डॉ. वैजयंता पाटील, प्रा. गजेंद्र माळी, प्रा. संपतराव जाधव, प्रा. संजीव सागर, प्रा. डॉ. कपिल राजहंस आणि एनएसएसचे स्वयंसेवकांनी श्रमदान केले. उपक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य बी. एस. पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.