यशासाठी कष्टाची तयारी ठेवा

यशासाठी कष्टाची तयारी ठेवा

jsp2020
83978
यड्राव : येथे शरद अभियांत्रिकेत स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना उदय भोसले यांनी मार्गदर्शन केले. या वेळी अनिल बागणे, डॉ. एस. ए. खोत आदी उपस्थित होते.
-----------------
यशासाठी कष्टाची तयारी ठेवा
उदय भोसले; शरद इंजिनिअरिंगमध्ये स्नेहसंमेलन
दानोळी, ता. २०ः विद्यार्थ्यांनी सातत्याने नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान मिळवण्यासाठी उत्सुक असायला हवे. लोकल टू ग्लोबल यश मिळवायचे असेल कष्टाची तयारी ठेवावी. महाविद्यालयातील सोयी-सुविधांची उपयोग करून जागतिक कंपन्यासाठी आवश्यक ती कौशल्य आत्मसात करावे. कमी कालावधीत शरद इंजिनिअरिंगने मिळविलेले यश आणि कौशल्यपूर्ण शिक्षणामुळे नामांकित कंपन्याना आकर्षित करीत आहे. त्यामुळेच विप्रो पारी या कंपनीचा संस्थेसोबत करार करीत आहोत, असे प्रतिपादन विप्रो पारी ऑटोमेशनचे एम्पलॉई अॅण्ड इंडस्ट्रीयल रिलेशन ग्लोबल हेड डॉ. उदय भोसले यांनी केले.
ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलनात बोलत होते. एचआर अनमोल शिंदे प्रमुख उपस्थित होते. संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे अध्यक्षस्थानी होते.
अनिल बागणे म्हणाले, ‘‘प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाताला काम देण्यासाठी योजना करीत असून पुढील दोन वर्षात देशातील पहिल्या दोनशे इन्स्टिट्यूटच्या रॅकिंगमध्ये शरद इन्स्टिट्यूट येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’ प्राचार्य डॉ. एस. ए. खोत यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक वितरण झाले. यामध्ये गुणवंत्त विद्यार्थी, क्रीडासह विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवले. उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून संजीवनी उगलमुगले हिचा सन्मान केला.
दुपारनंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर, प्रबोधनात्मक, शैक्षणिक व सांस्कृतिक विषयावर गीत सादर केले.
दरम्यान, दोन दिवसांमध्ये पारंपरिकदिन, रेकॉर्ड फिशपॉन्ड, फॅशन शो, रांगोळी, मेहंदी, पाककला, सॅलेड डेकोरेशन, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्स, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबलटेनिस आदी क्रीडा स्पर्धा झाल्या. प्राचार्य डॉ. एस. ए. खोत, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. पंकज पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रितीका बेदमुथा, वैदेही गुरव यांनी केले. आभार प्रा. पंकज पाटील यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com