जागरूक पालक, सुदृढ बालक मोहिम

जागरूक पालक, सुदृढ बालक मोहिम

GAD201.JPG
84043
हलकर्णी : जागरुक पालक, सदृढ बालक मोहिमेतंर्गत अंगणवाडी विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणी झाली. यावेळी डॉ. निलीमा धबाले व इतर उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------
जागरूक पालक, सुदृढ बालक मोहिम
नूल, ता : विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्‍या विविध आजारामुळे शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असतो. त्यामुळे आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी शासनाने दिलेल्या जागरुक पालक, सुदृढ बालक मोहीम यशस्वी करण्यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी नीलिमा धबाले यांच्या मार्गदर्शनाने तपासणी मोहिम सुरु केली आहे. सर्व उपकेंद्रातंर्गत अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी डॉ. धबाले यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक आर. एस. पाटील, प्रा. एस. एम. वडर, समुदाय आरोग्य अधिकारी स्नेहा दाभाडे, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
------------------------------------------------------------

घाळी कॉलेजमध्ये कार्यशाळा
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्यावतीने बी.एस्सी भाग तीनमधील विद्यार्थ्यांसाठी इंटरप्रिटेशन ऑफ एनएमआर स्प्रेक्ट्रा या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा झाली. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. संदीप केनवडे प्रमुख पाहुणे होते. डॉ. केनवडे यांनी स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशा प्रकारे होतो याची माहिती देण्यासह स्पर्धा परीक्षा, एमएस्सी प्रवेश परीक्षा, विविध फार्मासिटीकल कंपन्यांत व इतर केमिकल कंपनीमध्ये मुलाखतीसाठी एक महत्वाचा भाग म्हणून स्प्रेक्टोस्कोपीचा वापर केला जात असल्याचे सांगितले. डॉ. किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शिवानंद मस्ती यांनी मार्गदर्शन केले. प्रा. अश्‍विन गोडघाटे, डॉ. राजाराम सावंत, प्रा. विवेक इंगले, प्रा. पंकज डाफले आदी उपस्थित होते. प्रा. रेश्मा नागरपोळे यांनी आभार मानले.
--------------------------------------------------------

GAD202.JPG
84044
गडहिंग्लज : शिवजयंतीनिमित्त एटी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक मार्गावरील स्वच्छता केली. यावेळी अंजना तुरंबेकर व फाऊंडेशनचे सदस्य.

एटी फाऊंडेशनतर्फे स्वच्छता अभियान
गडहिंग्लज : शिवजयंतीचे औचित्य साधून येथील एटी फाऊंडेशनच्यावतीने शहरात स्वच्छता अभियान राबवले. माजी राष्ट्रीय फूटबॉल खेळाडू व फाऊंडेशनच्या संस्थापिका अंजना तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री दहा ते दीड या वेळेत राबवले. यामध्ये फाऊंडेशनच्या चौदा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. शिवजयंती मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व कचरा साफ करुन तो गोळा केला. काही नागरिकांनीही यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत उपक्रमाचे कौतूक केले.
--------------------------------------------------------------

अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी सुरु
गडहिंग्लज : येथील माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू अंजना तुरंबेकर यांच्या एटी फाऊंडेशनच्यावतीने अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीची सुरुवात केली. अकॅडमीत मुले व मुलींसाठी फुटबॉल प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्वत: तुरंबेकर मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. ग्रासरुट व युथ डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रीत करुन फुटबॉल खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणे हे अकॅडमीचे उद्दीष्ट असल्याचे तुरंबेकर यांनी सांगितले. दरम्यान, २२ फेब्रुवारीला सायंकाळी चारला एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर अकॅडमीचे उद्‍घाटन व मुली व मुलांचे प्रदर्शनीय सामने होणार आहेत. सहा ते खुला गट मुली व सहा ते १४ वयोगटातील मुलांसाठी सकाळी साडेसहा ते नऊ व सायंकाळी चार ते सहा या वेळेत प्रशिक्षण सुरु होणार आहे. इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com