सोहाळ्याचा शेतकरी
गव्याच्या हल्यात जखमी

सोहाळ्याचा शेतकरी गव्याच्या हल्यात जखमी

सोहाळ्याचा शेतकरी
गव्याच्या हल्ल्यात जखमी
साळगाव शिवारातील घटना
आजरा, ता. २० ः गव्याने केलेल्या हल्ल्यात आज शेतकरी पांडुरंग साबळे (रा. सोहाळेपैकी सोहाळेवाडी, ता. आजरा) जखमी झाले. महाजन नावाच्या शेतात भाताचे पिंजर भरत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. गव्याला चुकवताना शामराव दोरुगडे पडून जखमी झाले. यामुळे सोहाळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.
साबळे गावातील शेतकऱ्यांना घेऊन भाताचे पिंजर भरण्यासाठी महाजन नावाच्या शेतात गेले. साळगावच्या शिवारात त्यांचे शेत आहे. त्यांच्यासह शामराव दोरुगडे, बंडू दोरुगडे, जयदीप दोरुगडे, चंद्रकांत दोरुगडे, विश्वास दोरुगडे, स्वप्नील दोरुगडे, ज्ञानेश्वर सावंत (देऊळवाडी), आनंदा गावडे (वेळवट्टी) पिंजर ट्रॅक्टरमध्ये भरत होते. सोहाळे व साळगावच्या दोन शिवारामध्ये महाजनाचा ओढा आहे. तेथे झाडीत गवा होता. माणसांची चाहुल लागताच तो बिथरला व थेट गवत भरत असलेल्या ठिकाणी धावून आला. गवा बघितल्यावर सर्वजण धावू लागले. गव्याने धावत असलेल्या पांडुरंग साबळे यांना पाठीमागून धडक दिली. यामुळे त्यांना दुखापत झाली आहे. गव्यापासून दूर पळत सुटलेले शामराव जमिनीवर पडल्याने त्यांनाही दुखापत झाली. त्यांना आजरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

मोटारसायकलमुळे वाचला जीव
गव्याचा हल्ला चुकवण्यासाठी साबळे धावत सुटले. गव्याच्या आडवी मोटारसायकल होती. गवा मोटारसायकलला जोरात धडकला. त्यामुळे साबळे यांच्या पाठीमागे गव्याची निसटती धडक बसली आन्‌ त्यांचा जीव वाचला. ही मोटारसायकल चंद्रकांत दोरुगडे यांची असून त्याचे नुकसान झाले आहे.

अन्य एका घटनेत दोघे जण जखमी
चार दिवसांपूर्वी दोघे मोटारसायकलने आजऱ्याहून साळगावला जात होते. रस्त्यात अचानक गवा आडवा आल्याने मोटारसायकलस्वार त्याला जाऊन धडकले व जखमी झाले. तोच गवा साळगाव व सोहाळे परिसरात वावरत असण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com