एज्युकेशन पत्रके

एज्युकेशन पत्रके

विद्यापीठ हायस्कूलचे यश
कोल्हापूर : शाहू यूथ फाउंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त घेतलेल्या चित्रकला स्पर्धेत विद्यापीठ हायस्कूलने यश मिळवले. विद्यापीठ हायस्कूलचा विद्यार्थी साद पटटेकरी याने प्रथम क्रमांक मिळविला. ट्रॉफी, प्रशस्तिपत्रक, रोख रक्कम देऊन त्याला गौरवण्यात आले. मुख्याध्यापक एस. वाय. कुंभार, उपमुख्याध्यापिका श्रीमती एस. व्ही. रणनवरे, पर्यवेक्षक बी. डी. गोसावी, एच. एम. गुळवणी, चित्रकला विभागप्रमुख एस. व्ही. सोनार यांचे मार्गदर्शन लाभले.
---------
म. दुं. श्रेष्ठी यांना अभिवादन
कोल्हापूर : जिल्हा खादी ग्रामोद्योग संघ, जिल्हा स्वातंत्र्यसैनिक वारस संघटनेतर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, खादी संघाचे संस्थापक अध्यक्ष म. दुं. श्रेष्ठी यांच्या ४५ व्या स्मृतीस संघाचे अध्यक्ष सुंदरराव देसाई यांनी अभिवादन केले. प्राचार्य व्ही. डी. माने प्रमुख उपस्थित होते. देसाई म्हणाले, ‘‘श्रेष्ठी आण्णा हे विधायक व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी खादी संघाची आणि शिक्षण मंडळाची स्थापना केली. ते १९५२ चे पहिले आमदार होते. १९४२ च्या चळवळीत त्यांचा मोठा सहभाग होता. गडहिंग्लज आणि संकेश्‍वर कारखान्यांचे ते शिल्पकार होते. नगरपरिषदेचे पहिले अध्यक्ष, प्रजापरिषदेचे अर्थमंत्री, कॉँग्रेस, जनता पक्षाचे अध्यक्ष होते. त्यांनी गडहिंग्लज भागाचे नंदनवन केले.’’ प्राचार्य माने यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. सदाशिव मनुगडे, प्रा. सुजय देसाई, प्रा. डी. डी. चौगुले, प्रा. बाबासाहेब पाटील, गीताताई गुरव, सविता देसाई, सुमन पाटील, छायाताई भोसले, रेखा पाटील, सरदार आंबर्डेकर, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
----------
शाहू ज्येष्ठ संघातर्फे आज सभा
कोल्हापूर : राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे मासिक सभा बुधवारी (ता. २२) सायंकाळी चार वाजता बाळासाहेब विरंगुळा केंद्र, टाऊन हॉल येथे आयोजित केली आहे. प्राचार्य सुरेश कांबळे हे ‘ज्येष्ठ नागरिक यांचे मानसिकता’ यावर व्याख्यान देणार आहेत. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष डी. एस. घोलराखे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
------------
शांतीनगर मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिर
कोल्हापूर : पाचगाव येथील शांतीनगर येथील शांतीनगर मित्र मंडळातर्फे शाहू ब्लड बँक, रोटरी क्लब यांच्यातर्फे रक्तदान शिबिर झाले. मंडळाने यावर्षी शिव जयंतीमध्ये प्रचलित डीजे, फटाके टाळून छत्रपतींचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जयंती समाजाभिमुख पद्धतीने साजरी केली. यासाठी ज्येष्ठ नागरिक, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
-----------
न्यू प्राथमिक विद्यालयात स्नेहसंमेलन
कोल्हापूर : न्यू प्राथमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम झाला. संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले. एस.एस.सी. बोर्डाचे विभागीय सचिव डी. एस. पोवार उपस्थित होते. संचालक आर. डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी पालकांनी आपल्या पाल्याचा अभ्यास, खेळ, आहाराकडे लक्ष द्या, असे सांगितले. मुख्याध्यापिका एस. डी. खंडागळे यांनी स्वागत केले. ज्येष्ठ सहायक शिक्षिका एस. आर. जानकर यांनी शाळेचा अहवाल सादर केला.
विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी, उत्कृष्ट वक्तृत्व तसेच वर्गातील प्रथम विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी गणेश स्तवन, श्री शंकर नमन, गोंधळ-जागर गीत, गोवण गीत, छत्रपती शिवरायांना मानवंदना, गान सम्राज्ञी लता मंगेशकर ट्रीब्यूट, लावणी, देशभक्तिपर गीत तसेच चित्रपट गीते, नृत्याविष्कार सादर करण्यात आले. सहायक शिक्षिका विद्या घारे, शीतल पाटील, शुभांगी खोडवे यांनी सूत्रसंचालन केले. मीनल गोसावी यांनी आभार मानले. संस्थेचे उपाध्यक्ष डी. जी. किल्लेदार, खजानीस वाय. एस. चव्हाण, संचालक पी. सी. पाटील, वाय. एल. खाडे, पी. के. पाटील, विनय पाटील, सविता पाटील, सचिव एस. जे. मेटील, संस्थेचे आजीव सेवक उदय पाटील, अधीक्षक एस. एस. पाटील, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
-------------
शिंदे सरकार कॉलेजमध्ये कार्यशाळा
कोल्हापूर : डी. डी. शिंदे सरकार कॉलेज येथे डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स क्लस्टरअंतर्गत महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाकडून ‘ग्रंथालयांची गरज’ यावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. संस्थेच्या अध्यक्षा माधुरी शिंदे, प्रथमेश शिंदे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. प्रभारी प्राचार्य डॉ. पी. आर. पवार यांनी स्वागत केले. प्रथम सत्रातील बीजभाषण शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालय विभागातील डॉ. शिवराज थोरात यांनी केले. द्वितीय सत्रात डॉ. थोरात यांनी संशोधनामध्ये ग्रंथालयाचे असलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली. तिसऱ्या सत्रात कुरुकलीतील भोगावती महाविद्यालयातील ग्रंथपाल प्रा. प्रशांत कल्लोळी यांनी ‘चॅट जी.पी.टी’ यावर भाषण केले. प्रभारी प्राचार्य डॉ. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनी वैष्णवी पवार, मळवदे हिने आभार मानले. विश्‍वश्री पाटील हिने सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल स्वाती तोरस्कर यांनी संयोजन केले.
---------------
श्री दत्ताबाळ हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलन
कोल्हापूर : श्री दत्ताबाळ मिशन डिव्हाईन संचालित श्री दत्ताबाळ हायस्कूल, श्रीदत्ताबाळ शिशुविहार, श्री दत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिरतर्फे ३३ वे वार्षिक बालक-पालक सांस्कृतिक स्नेहसंमेलन झाले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या माजी कोषाध्यक्षा वैशाली राजेश क्षीरसागर प्रमुख उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करत समूहगीत, लावणी, देशभक्तिपर गीते सादर केली. संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी देसाई, उपाध्यक्ष दीपक गोरे, सचिव नीलेश देसाई, विश्‍वस्त वेद देसाई, व्यवस्थापक संदीप डोंगरे, मुख्याध्यापक सचिन डवंग, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे, प्रणिता वर्धमाने, सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. बालाजी मुंढे, रोहिणी शिंगे यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले.
--------------
कॉसमॉस प्ले स्कूलचे स्नेहसंमेलन
कोल्हापूर : श्री दत्ताबाळ मिशन डिव्हाईन संचालित कॉसमॉस प्ले स्कूल, श्री दत्ताबाळ इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे १० वे वार्षिक बालक सांस्कृतिक स्नेहसंमेलन झाले. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सत्यजित कदम, माजी नगरसेवक विलास वास्कर, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, माजी नगरसेवक आशिष ढवळे, विजेंद्र माने उपस्थित होते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी कलागुण सादर करत समूहगीत, लावणी, देशभक्तिपर गीते सादर केली. संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी देसाई, उपाध्यक्ष दीपक गोरे, सचिव नीलेश देसाई, विश्‍वस्त वेद देसाई, व्यवस्थापक संदीप डोंगरे, कीर्ती मिठारी, वनिता जाधव, सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक उपस्थित होते. प्रगती कोरडे, मानसी धनवडे यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहा बगरे यांनी आभार मानले.
-------------
प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूलमध्ये पारितोषिक वितरण
कोल्हापूर : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचालित प्रिन्स शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरणाचा समारंभ झाला. न्यू पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. संजय दाभोळे, न्यू कॉलेज फार्मसीचे प्राचार्य डॉ. रवींद्र कुंभार प्रमुख उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष डी. जी. किल्लेदार अध्यक्षस्थानी होते. शाळेचे अधीक्षक प्रा. सी. एम. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. मनीषा राऊत यांनी परिचय करून दिला. मुख्याध्यापिका रेणू निंबाळकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. माधुरी यादव, वृषाली काळे, राणी जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रुपा यादव यांनी आभार मानले. संस्थेचे खजानीस वाय. एस. चव्हाण, संचालक य. ल. खाडे, सविता पाटील, आर. डी. पाटील, आजीव सेवक उदय पाटील, मुख्याध्यापक एस. एस. पाटील, मुख्याध्यापिका हर्षदा गोसावी, मुख्याध्यापिका खंडागळे, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्‌घाटन धर्मादाय सहआयुक्त कार्यालयातील अधीक्षक तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या हस्ते झाले. संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
----------
कमला महाविद्यालयात कार्यशाळा
कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठ, कमला कॉलेजमध्ये डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स क्लस्टर लीड कॉलेज योजनेअंतर्गत ‘मिलेट्स फ्युचर ऑफ फूड अँड फूड इंडस्ट्री’ यावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्समधील प्रा. डॉ. ए. एस. बन्ने यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर अध्यक्षस्थानी होत्या. लीड कॉलेज समितीच्या समन्वयिका मेजर प्रा. वर्षा साठे प्रमुख उपस्थित होत्या. समन्वयक सिद्धार्थ चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रा. बन्ने यांनी भरड धान्याचे आहाराच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व सांगितले. प्राचार्या डॉ. मुडेकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांची प्रेरणा लाभली. कार्यशाळा तीन सत्रांत झाली. प्रथम सत्रामध्ये अन्न तंत्रज्ञान विभागातील प्रा. डॉ. सिद्धार्थ लोखंडे यांनी ‘इंडियन मिलेट्स’ याबद्दल सहभागींना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये बोरगाव सातारा येथील कृषी विज्ञान केंद्र प्रा. डॉ. के. पी. बाबर यांनी ‘रिसेन्ट ट्रेंडस इन मिलेट प्रोसेसिंग’ यावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये रंजिता पाटील यांनी ‘इंटरप्रेनरशिप इन मिलेटस अँड न्युट्रिशन, हेल्थ बेनिफिट्स इन मिलेटस’ यावर माहिती दिली. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर उपस्थित होत्या. प्रा. सिद्धार्थ चव्हाण यांनी कार्यशाळेचे अहवाल वाचन केले. प्रा. अक्षय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सिद्धार्थ चव्हाण यांनी आभार मानले. सुहासिनी व्हसकोटी, गौशिया कटगेरी उपस्थित होते.
---------------
84338
प्रा. शहाजी कांबळे
प्रा. शहाजी कांबळे यांची निवड
कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांची सातारा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून निवड झाली. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी पुणे येथे पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकारी सभेत निवडीची घोषणा केली. तसेच कुमार कांबळे (चंदूर), जानबा कांबळे (चंदगड), बी. आर. कांबळे (कागल), ॲड. राहुल सडोलीकर, नागसेन जाधव (कोल्हापूर) यांचीही निवड झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com