३२ शिक्षकांच्या बदलीचा तिढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३२ शिक्षकांच्या बदलीचा तिढा
३२ शिक्षकांच्या बदलीचा तिढा

३२ शिक्षकांच्या बदलीचा तिढा

sakal_logo
By

लोगो- जिल्‍हा परिषद

३२ शिक्षकांच्या बदलीचा तिढा
सुगम भागातून होणार दुर्गम भागात बदली

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २३ : प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षक बदल्यांची यादी तयार केली आहे. यात जिल्‍ह्यात संवर्ग एकमधील ३२ शिक्षकांचाही समावेश आहे. संबंधित शिक्षकांनी या बदली प्रक्रियेत आपली गैरसोय होत असल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे केली आहे. काही शिक्षक हे संवर्ग एकमधील असल्याने या शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी जाणे शक्य नसल्याचे पत्रही शिक्षण विभागाला दिले आहे. विभागाकडे आलेल्या तक्रारी या राज्य शिक्षण विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवल्या जाणार आहेत.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून केल्या जात आहेत. यामध्ये जिल्‍ह्यातील ३२ शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. यातील काही शिक्षकांनी फारच सोयीच्या शाळा शोधल्याने, काहींनी माहिती भरताना अंदाज न आल्याने, काहींनी चुकीची माहिती भरल्याने बदलीचे संकट ओढवले असल्याचे शिक्षण विभागाचे मत आहे. या पोर्टलमध्ये माहिती भरत असताना बदली नको असेल तर त्यापद्धतीने माहिती भरणे आवश्यक होते. मात्र, फारच सोय करण्याच्या नादात सुगम भागातून दुर्गम भागात जाण्याची वेळ या शिक्षकांवर आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
बदली होणाऱ्या शिक्षकांमध्ये अनेक शिक्षकांनी वयाची ५३ वर्षे पूर्ण केली आहेत. तर काहींनी संवर्ग एकमधील अटींची पूर्तता केली आहे. तरीही त्यांच्या बदल्या केल्या आहेत. एका शिक्षकाने ५६ वर्षे पूर्ण केली आहेत. सहा महिन्यांपूर्वी पदोन्‍नतीही घेतली आहे. असे असताना त्यांना बदलीच्या ठिकाणी जावे लागणार आहे. त्यामुळे या बदलीतून नावे वगळण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे.