महसुल क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन

महसुल क्रीडा स्पर्धेचे उद्‌घाटन

85117, 85118

खेळामुळे आरोग्य. मन सुदृढ राहते
पालकमंत्री केसरकर; पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : ‘‘प्रत्येक खेळाडूंनी खेळ केवळ खेळाच्या भावनेतूनच खेळला पाहिजे. त्यामुळे खेळाडूंमध्ये परस्पर सहकार्य, शिस्त, संघटन, सहनशीलपणा येतो. चांगले व्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते. खेळातूनच सुदृढ आरोग्य, सुदृढ आरोग्यातून सुदृढ मन निर्माण होत असते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूंनी सुदृढ मन, आरोग्यासाठी खेळाचा आनंद घ्यावा,’’ असे आवाहन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केले.
पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्‌घाटन पोलिस कवायत मैदान येथे पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महसूल विभागाचे विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व उपायुक्त, पाच जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी, महसूल विभागाचे सर्व उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर म्हणाले, ‘‘शासनाच्या अनेक विभागात कामाचा प्रचंड ताण असतो. त्यातील महसूल विभाग एक आहे. कामाचा अतिरिक्त ताण कमी व्हावा, नेहमीच्या कामापासून थोडे दूर जाऊन शरीराला, मनाला उभारी येण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा महत्त्वाच्या ठरत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला मर्दानी खेळाचा एक मोठा इतिहास आहे. याच शहरात महसुली क्रीडा स्पर्धा होत असल्याचा आनंद आहे.’’
विभागीय आयुक्त राव यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपापल्या क्रीडा प्रकारात चांगले प्रदर्शन करावे, असे आवाहन केले. जिल्हाधिकारी रेखावार यांनी सर्व स्पर्धकांच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना, खेळातील प्राविण्यास वाव देण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले
पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील स्पर्धकांनी संचलन केले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा प्रथम, सांगली जिल्हा द्वितीय, सातारा जिल्ह्याचा तृतीय क्रमांक आला. १०० मीटर धावण्याची स्पर्धा झाली. विजेत्यांना विभागीय आयुक्त राव यांच्या हस्ते गौरविले. स्पर्धेमध्ये 50 विविध खेळामध्ये ७५० स्पर्धेकांनी सहभाग घेतला आहे. मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com