सुमंगल- सलाम किसान समूह

सुमंगल- सलाम किसान समूह

85313
कोल्हापूर ः कणेरी मठावरील लोकोत्सवात सलाम किसान समूहातर्फे शेतकऱ्यांना विविध सेवा व योजनांची माहिती दिली जात आहे.

‘सलाम किसान''कडून
शेतकऱ्यांना विविध सेवा
कोल्हापूर, ता. २५ ः कणेरी मठावरील सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात शेतकऱ्यांना हव्या त्या आणि शेतकऱ्यांच्या मनातील थेट सेवा ‘सलाम किसान’कडून शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत.
कृषी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी अगदी महत्त्वाची भूमिका पार पाडत असलेला हा समूह नेहमीच गर्दी खेचतो. येथील लोकोत्सवातही शेतकऱ्यांचा या स्टॉलला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, परिषद, वैश्विक संदेश पाच तत्वांच्या पाच भव्य मंडपात प्रदर्शन, विशेष आयुर्वेद दालन, गुरूकुल पद्धती प्रदर्शन, पशु-पक्षी प्रदर्शन, कृषी अवजार, पारंपारिक कृषी ज्ञान, बीज भांडार, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, कुलगुरू, राजदूत, अधिकारी, पर्यावरण विभाग, उद्योजक यांनीही लोकोत्सवात सहभाग घेतला आहे.
‘सलाम किसान''च्या शेती क्षेत्रातील आणि शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वपूर्ण सेवा आणि योजनांचा येथे समावेश आहे. केवळ सात मिनिटात ड्रोन फवारणी, वाहतूक सुविधा, नव्वद सेकंदातील माती परीक्षण, शीतगृह, गोदाम सुविधा अशा अनेक प्रकारच्या सुविधा शेतकऱ्यांना ‘सलाम किसान''ने उपलब्ध केल्या आहेत. कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान येथे बघायला मिळत असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समूहाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com