क्रिकेटमध्ये वडगाव, कबड्डीत शिरोळ प्रथम

क्रिकेटमध्ये वडगाव, कबड्डीत शिरोळ प्रथम

85583
गडहिंग्लज : पालिकेतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेतील प्रथम वडगाव पालिकेच्या संघाला स्वरुप खारगे यांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले.

क्रिकेटमध्ये वडगाव,
कबड्डीत शिरोळ प्रथम
गडहिंग्लज पालिकेतर्फे स्पर्धा; पन्हाळा, कुरुंदवाड पालिका उपविजेते
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २७ : येथील नगरपरिषदेतर्फे माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत झालेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत वडगाव पालिकेने, तर कबड्डी स्पर्धेत शिरोळने विजेतेपद पटकावले. अनुक्रमे पन्हाळा व कुरुंदवाड पालिकेला उपविजेतेपद मिळाले. शिवराज व दिनकरराव शिंदे विद्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा झाल्या.
जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपालिका व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांत दैनंदिन कामकाजातून विरंगुळ्याचे क्षण निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धा घेण्यात आल्या. क्रिकेटमध्ये १६, तर कबड्डीमध्ये १२ संघांनी सहभाग घेतला. जिल्हा सहआयुक्त तैमूर मुल्लाणी यांच्याहस्ते उद्‍घाटन झाले. स्पर्धेसाठी दोन लाखांचा निधी देणगी स्वरुपात संकलित झाला होता. काही कंपन्यांनी सीएसआर फंडातून देणगी दिली होती. क्रिकेटचे पहिले २० हजारांचे बक्षीस स्वाती कोरी, दुसरे ११ हजाराचे बक्षीस माजी नगरसेवक बसवराज खणगावे यांनी, तर कबड्डीसाठीचे पहिले ११ हजार रामगोंड ऊर्फ गुंडू पाटील, तर दुसरे सात हजारचे बक्षीस राजेंद्र तारळे यांनी पुरस्कृत केले होते. शहरातील विविध पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजकांनीही स्पर्धेसाठी देणगी दिली. सहआयुक्त मुल्लाणी यांनी जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धा घेऊन गडहिंग्लज पालिकेने खेळाडूंना प्रोत्साहित केल्याबद्दल मुख्याधिकारी स्वरुप खारगे व सर्व संयोजक कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. पालिकेचे विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनी स्पर्धेचे यशस्वीरित्या संयोजन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com