शासन निर्णयानुसारच निधीचे वितरण करा

शासन निर्णयानुसारच निधीचे वितरण करा

जिल्‍हा परिषद
... लोगो
...

शासन निर्णयानुसारच निधीचे वितरण करा
---
जिल्‍हाधिकाऱ्यां‍चे आदेश; जनसुविधा, नागरी सुविधा निधीचा तिढा

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. २७ : जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामपंचायतींना जनसुविधा व नागरी सुविधेसाठी विशेष अनुदान देण्यात येते. मात्र, हे अनुदान वितरण करीत असताना ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी. तसेच, केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्‍हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्‍हा परिषदेला दिले आहेत. जिल्‍हा नियोजन समितीचे सदस्य राजू मगदूम यांनी याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर जिल्‍हाधिकाऱ्यां‍नी वरील आदेश दिले आहेत.
नियोजन समितीचे सदस्य श्री. मगदूम यांनी जनसुविधा व नागरी सुविधा निधीच्या वितरणाबाबत तक्रार करीत त्यातील निकषांकडे लक्ष वेधले आहे. या निधीचे वितरण करण्यासाठी ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या १६ सप्टेंबर २०१० या शासन निर्णयात स्‍पष्‍ट सूचना देण्यात आल्या आहेत. या निधीचे वाटप कसे व्‍हावे, लोकसंख्येनुसार देय निधी, त्याचे निकष याबाबत सविस्‍तर सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या निर्णयाचे उल्‍लंघन करून लोकप्रतिनिधी शिफारस करतील, त्या गावांना निधी देण्याचा प्रयत्‍न सुरू आहे. त्यामुळे पात्र गावांवर अन्याय होणार आहे. जर चुकीचे निधी वितरण करण्यात आले, तर उच्‍च न्यायालयात जाण्याचा इशारा श्री. मगदूम यांनी दिला. याबाबतचे पत्र जिल्‍हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्‍हा नियोजन अधिकारी यांनाही देण्यात आले होते. यावर जिल्‍हाधिकारी यांनी वरील आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com