चोरट्या महिलेस अटक -अडीच लाखांचा ऐवज जप्त

चोरट्या महिलेस अटक -अडीच लाखांचा ऐवज जप्त

85950
--------

‘केएमटी’मध्ये दागिन्यांची पर्स
चोरणाऱ्या महिलेस अटक
कोल्हापूर, ता. २८ ः चोरलेले दागिने गुजरीत विक्रीस आलेल्या गडहिंग्लजच्या चोरट्या महिलेस जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. माधवी श्रीनिवास सकट (वय २८, रा. मांगलेवाडी, बी.एस.एन.एल. कार्यालयासमोर, गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. तिच्याकडून खासबाग येथून चोरलेली सुमारे चार तोळ्यांची दोन लाख ४० हजार रुपये किमतीची सोन्याची मोहनमाळ हस्तगत केली आहे, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, की फिर्यादी सुवर्णा श्रीकांत पोतदार या ३ फेब्रुवारीला दुपारी दीडला शाहू खासबाग येथील बसस्थानकावरून गजानन महाराज नगरातील घरी जात होत्या. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या पर्समधील चार तोळ्यांची सोन्याची तीन पदरी मोहनमाळ चोरली. याबाबत त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी कोणी महिला मोहनमाळ विक्रीस आल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते.
पोलिसांच्या आवाहनानुसार पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रशांत घोलप यांना आज एक महिला गुजरीत मोहनमाळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचला. मात्र, माधवी सकट तेथे आल्यावर तिला संशय आला. ती चलबिचल झाली. त्यामुळे प्रशांत पांडव, सागर डोंगरे, सारिका खोत, ज्योती पाटील आदी पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. त्या वेळी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिच्या हातातील कापडी पिशवीत पाहिले असता मोहनमाळ मिळाली. तिला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता तिने खासबाग मैदान येथून मोहनमाळ चोरल्याची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com