जयसिंगपुरात ३२२ नळ कनेक्शन तोडले

जयसिंगपुरात ३२२ नळ कनेक्शन तोडले

जयसिंगपुरात ३२२ नळ कनेक्शन तोडले
पालिकेची वसुली मोहीम गतिमान; पाणीपट्टी वसुली निम्म्यावर
गणेश शिंदे : सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. ३ : मिळकत वसुलीसाठी पालिका प्रशासनाने शहरातील ३२२ नळ कनेक्शन तोडले तरी कर भरण्याकडे अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. केवळ ३२ नळ कनेक्शनधारकांनी कर भरून पाणीपुरवठा सुरू करून घेतला आहे. पालिका प्रशासनाने वसुलीसाठी नळ कनेक्शन तोडण्याची मोहिम गतिमान केली आहे. प्रशासकांच्या काळात या वर्षी कोणत्याही दबावाशिवाय वसुली मोहीम सुरू असल्याने अनेक मिळकतधारकांचे धाबे दणाणले आहेत.
शहरातील मिळकतींच्या कर निश्चीतीकरणात छुप्या मिळकती उघड होत असताना बेकायदेशीर नळ कनेक्शनचा नवा मुद्दा पुढे आला आहे. बेकायदेशीर नळ कनेक्शनप्रश्नी पालिका प्रशासन दक्ष झाले आहे. बेकायदेशीर नळ कनेक्शन शोध आणि वसुली मोहीम गतिमान झाली आहे. त्यामुळे वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या नळ कनेक्शनधारकांचे धाबे दणाणले आहेत. शहरातील मिळकतींचे खासगी कंपनीद्वारे कर निश्चीतीकरण केले जात आहे. यात मोठ्या प्रमाणात छुप्या मिळकती आढळून येत आहेत. यानंतर आता पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कर न भरणाऱ्या मिळकती उघड होत असताना पालिकेच्या उत्पन्नावर चांगला परिणाम होणार असून कोट्यवधींच्या महसुलात भर पडणार आहे. याशिवाय बोगस नळ कनेक्शनमुळेही करवाढ होणार आहे. शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण खासगी कंपनीमार्फत होत असल्याने याला कृती समितीची स्थापना करून विरोध केला होता.
कृती समितीच्या माध्यमातून विरोध करताना पालिकेवर मोर्चा काढून मुख्याधिकाऱ्यांना घेराओ घातला होता. जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देऊन कैफियत मांडली. या सगळ्या प्रकारातही कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून युध्दपातळीवर शहरात सर्वेक्षण केले. सर्वेक्षण पूर्ण होत आले आहे. शाहूनगरसह काही भागात याला विरोधही झाला. मात्र या भागातही सर्वेक्षण झाले आहे. कृती समितीच्या आंदोलनाची धार कमी झाल्याने विरोध मावळत गेला.
खासगी कंपनीच्या सर्वेक्षणात शहरातील छुप्या मिळकती उघड होत असल्याने प्रशासनाच्यादृष्टीने ही बाब जमेची ठरली आहे. छुप्या मिळकती उघड होत असताना आता पालिकेचा पाणीपुरवठा विभागही आता दक्ष झाला आहे. छुप्या मिळकतींचे पाणीपुरवठा विभागाच्या वतीनेही तपासणी केली जाणार आहे. कर वसुलीच्या निमित्ताने शहरातील बेकायदेशीर नळ कनेक्शनवरही लक्ष ठेवले जात आहे.
....

पाणीपट्टी वसुली धिम्या गतीने
मार्च सुरू झाला तरी शहरातील पाणीपट्टी वसुली निम्म्यावर आली आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ कर वसुलीबाबत आवाहन करूनही प्रशासनाला कठोर कारवाई करावी लागत आहे. या महिन्यात प्रशासनाला अधिकाधिक वसुली करावी लागणार आहे.
....

शहरात कर वसुली मोहिम गतिमान केली आहे. घरफाळा व पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला जात आहे. महिनाभरात वसुलीचे अधिकाधिक उद्दिष्‍ट गाठण्याचा प्रयत्न राहणार आहे.

- प्रफुल्लकुमार वनखंडे, कर निरीक्षक तथा उपमुख्याधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com