कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादीच नाही

कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादीच नाही

कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादीच नाही
आडसुळेंचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; कारवाईची मागणी
कोल्हापूर, ता. २ : दरवर्षी एक जानेवारी रोजी सेवाज्येष्ठता यादी जाहीर करणे बंधनकारक असताना महानगरपालिका कर्मचाऱ्यांची मात्र अद्याप यादी जाहीर झालेली नाही. हे शासकीय काम करण्यास हेतुपुरस्सर विलंब केल्याबद्दल संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई केली जावी अशी मागणी माजी नगरसेवक पांडुरंग आडसुळे यांनी मुख्यमंत्री तसेच नगरविकास विभागाच्या सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रारूप ज्येष्ठता यादी आठ दिवसात प्रसिध्द करून हरकती मागवाव्यात, असेही म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली २०२१ नुसार शासनाच्या विविध सेवांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता यादी प्रत्येक वर्षी तयार करून ती जाहीर करण्याबाबत धोरण ठरविले आहे. त्यानुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी दरवर्षी १ जानेवारी रोजी ही यादी जाहीर करणे बंधनकारक केले आहे. महानगरपालिका प्रशासनाने यावर्षीची यादी ठरवलेल्या तारखेला दोन महिने उलटले तरी जाहीर केलेली नाही. यादी जाहीर करणे बंधनकारक असताना शासकीय कर्तव्य पार पाडण्यास हेतुपुरस्सर विलंब लावला गेला आहे. तसेच याकडे दुर्लक्ष करून चालढकल केली आहे. तरी याबाबतच्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊन संबंधित अधिकाऱ्याच्या गोपनीय अहवालात नोंद करण्यात यावी. शिस्तभंगाची कारवाई होण्यासाठी आयुक्तांना आदेश द्यावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com