न्यू कॉलेजमध्ये कार्यशाळा

न्यू कॉलेजमध्ये कार्यशाळा

86713
कोल्हापूर : न्यू कॉलेज येथे खगोलीय दुर्बीण निर्मिती कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षक.

न्यू कॉलेजमध्ये खगोलीय
दुर्बीण निर्मिती कार्यशाळा
कोल्हापूर ः सोळांकूर येथील श्री यशवंतराव पाटील सायन्स कॉलेज आणि न्यू कॉलेज यांच्या भौतिकशास्त्र विभागांच्या संयुक्त विद्यमाने खगोलीय दुर्बीण निर्मिती कार्यशाळा झाली. डॉ. अविराज जत्राटकर यांनी मार्गदर्शन केले. दुर्बिणी तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे आणि खगोलशास्त्राविषयी जनमानसात जागृती निर्माण करणे हे उद्दिष्ट होते. स्वतः खगोलीय दुर्बीण तयार करून त्यातूनच आकाशनिरीक्षण करण्याचा आनंद सहभागी विद्यार्थ्यानी घेतला.
तीन सत्रांमध्ये झालेल्या एकदिवसीय कार्यशाळेत खगोलीय दुर्बिणींची सविस्तर माहिती, त्यांचे प्रकार आणि त्यांचे उपयोग त्याचप्रमाणे विश्वाचा उलगडा करणाऱ्या जगभरात वापरल्या जाणाऱ्या महाकाय दुर्बिणींची माहिती दिली. दुर्बिणी तयार करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य निवडण्यापासून ते त्यापासून दुर्बीण तयार करण्यापर्यंत सर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. प्राचार्य डॉ. जी. जी. चौगले, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. सिकंदर तांबोळी, डॉ. ए. ए. कलगोंडा, डॉ. प्रदीप कांबळे, एस. के.सुतार उपस्थित होते. प्रास्ताविक स्वप्नाली पवार यांनी केले. रेश्मा बेडगकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com