शेणी देण्याचे आवाहन

शेणी देण्याचे आवाहन

‘पर्यावरणपूरक होळी
साजरी करून शेणी
द्या स्मशानभूमीस’

कोल्हापूर ः यंदाही शहरवासीयांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करून पंचगंगा व इतर स्मशानभूमीकडे शेणी देण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. सोमवारी (ता. ६) होळी पोर्णिमा आहे.
शहरात होळी पोर्णिमा उत्साहात साजरी केली जाते. शहरातील रस्ते खराब होऊ नयेत व पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी मंडळांकडून दरवर्षी पर्यावरणपूरक होळी साजरी केली जाते. यामध्ये तरुण मंडळे, तालीम संस्था व सेवाभावी संस्था छोटी होळी साजरी करुन शेणी सामाजिक भावनेतून महापालिकेच्या स्मशानभूमीकडे देतात. यावर्षीही शेणी स्मशानभूमीकडे देण्यासाठी पंचगंगा स्मशानभूमी (९७६६५३२०२७), कसबा बावडा स्मशानभूमी (९७६६५३२०३५), कदमवाडी स्मशानभूमी (९१५६३३४७००), बापट कॅम्प स्मशानभूमी (९१५६४२२२६५) येथे संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com